Home > विदर्भ > हमीपत्राच्या आधारे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करा : यूटीए ची मागणी....

हमीपत्राच्या आधारे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करा : यूटीए ची मागणी....

हमीपत्राच्या आधारे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करा : यूटीए ची मागणी....
X

म-मराठी न्यूज़ नेटवर्क

विशेष प्रतिनिधी/वासीक शेख

यवतमाळ, दि.४ : हमीपत्राच्या आधारे वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करणे बाबत शालेय शिक्षण मंत्री मा.ना. वर्षा ताई गायकवाड यांना शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प यवतमाळ यांचा मार्फत उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) चे वतीने मंगलवार दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी एक निवेदन देण्यात आला.

या निवेदनात शासन निर्णय संदर्भ क्र:शिप्रधो/2019/प्र.क्र 42/प्रशिक्षण दि:26/08/2019 च्या अन्वय शिक्षकांना बारा वर्षानंतर वरिष्ठ श्रेणी व चोवीस वर्षानंतर निवड श्रेणी लागू करणे बाबत सुधारित तरतुदी निश्चित करण्यात आली व त्यात पूर्वीचे शासन निर्णय अधिक्रमित केल्याने पात्र शिक्षकांना प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक करण्यात आले आहे,

अमरावती विभागातील मा.शिक्षण उपसंचालक यांचे आदेशानुसार जिल्ह्यात शिक्षण विभागात वरिष्ठ व निवड श्रेणी पात्र शिक्षकांचे प्रस्ताव प्रलंबित आहे पण वरील संदर्भीय शासन निर्णयामधील मुद्दा क्र 2 नुसार प्रशिक्षण आवश्यक असल्याने सदर प्रस्तावाला मंजुरी प्रदान करण्यात आलेली नाही, सदर प्रस्ताव प्रशिक्षण पूर्ण करण्याचे हमीपत्राच्या आधारे निकाली काढण्यात यावे व या संबंधी योग्य आदेश व्हावे ही अशी विनंती

उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) चे वतीने देण्यात आलेले निवेदनात करण्यात आली आहेत.

निवेदन देताना उर्दू टीचर्स असोसिएशन (यूटीए) चे जिल्हाध्यक्ष सलीम खान सर,आइडियल एजुकेशन सोसायटी यवतमाळचे संस्थापक सैय्यद मक़सूद अली पटेल सर,यूटीए चे कार्यकारी अध्यक्ष अयाज़ खान सर,यूटीए चे जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल समद सर,जिल्हा उपाध्यक्ष मोहम्मद अतीक सर,जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद मुजफ्फर हुसैन सर, जिल्हा संघटक मोहम्मद मुसद्दिक सर,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद खालीद तागले सर उपस्थित होते.असे एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मोहम्मद खालीद तागले सर यांनी कळविले.

Updated : 4 Nov 2020 7:42 AM GMT
Next Story
Share it
Top