Home > विदर्भ > स्वातंत्र्य सैनिक महाळप्पा पटणे यांना बिलोलीत अभिवादन

स्वातंत्र्य सैनिक महाळप्पा पटणे यांना बिलोलीत अभिवादन

"स्वातंत्र्य सैनिक महाळप्पा पटणे यांना बिलोलीत अभिवादन"

प्रतिनीधी/ए.जी.कुरेशी

बिलोली :- येथील स्वातंत्र्यसैनिक महाळप्पा चनमलप्पा पटने यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (ता.२२)येथील जनक्रांती सार्वजनिक वाचनालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी वाचनालयाचे संचालक अॅड. दिगंबरराव कुंचोलीकर,प्रा. आनंदराव मांजरमकर, शिवाजी पांडागळे, सुभाष पाटील, दिगंबर लघूळकर,वायेगावे गुरुजी, दिगंबर बिलोलीकर आदींची उपस्थिती होती. बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील महाळप्पा पटणे माध्यमिक विद्यालयातही अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संस्थेचे चंद्रशेखर पाटील सावळीकर, उपाध्यक्ष मारुती आवळके पाटील, सचिव शिवलिंगराव ईबिते, माजी सरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन अंबादास शिनगारे, ग्रामपंचायत सदस्य बाबुराव हलबुर्गे, ईरवंत शिंदे, मुख्याध्यापक लगडे आदींची यावेळी उपस्थिती होती...

Updated : 25 Oct 2020 9:28 AM GMT
Next Story
Share it
Top