Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > स्वातंञ्यानंतर पहिल्यांदाच स्वातञ्यदिन शासकिय बंधनात साजरा

स्वातंञ्यानंतर पहिल्यांदाच स्वातञ्यदिन शासकिय बंधनात साजरा

स्वातंञ्यानंतर पहिल्यांदाच स्वातञ्यदिन शासकिय बंधनात साजरा
X

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर स्वातंञ्य दिनाच्या राष्र्टीय सणावरही निर्बंध

फुलचंद भगत

मंगरुळपीर : सध्या सर्वञ कोरोनाने थैमान घातल्याने स्वतंञ भारतातील आतापर्यत पहिल्यांदाच स्वातंञ्यदिनही शासकिय निर्बंधामध्ये ठिकठिकाणी साजरा करन्यात आला.शासकिय नियमांचे पालन करत हा राष्र्टीय ऊत्सव साजरा झाला.

ब्रिटिशांच्या गुलामगीरीतुन आपला प्रिय भारत देश १५ आॅॅगष्ट १९४७ ला ब्रिटिश गुलामगिरीतून आझाद झाला. १५ आगष्ट हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याची परंपरा भारतात सुरू झाली. ढोल ताशांच्या गजरात ठिकठिकाणी प्रभात फेऱ्या, मिरवणुका, आनंदात व हर्षोऊल्लासात लाऊडस्पीकरच्या आवाजात सांस्कृतिक कार्यक्रम, माईकच्या सहवासात संवाद, परिसंवाद, वक्तृत्व स्पर्धा इ. कार्यक्रमास मोठया उत्साहाने साजरा करण्यात येत होता.मात्र २०२० हे वर्ष असे उजाडले की देशात आपला राष्ट्रीय सण-उत्सव साजरा करण्यास देशाला कोविड-१९ या विषाणूने निर्बंध घातले. कोविड विषाणूची बाधा सर्व भारतभर झाली. त्याला नियंत्रीत करण्यासाठी सामाजिक अंतर राखणे सर्व भारतीयांसाठी बंधनकारक झाले.कोविड विषाणूने भारत देशातील कुटुंबच्या कुटुंब कोरोनाने आपल्या विळख्यात घेतली. काही कुटुंबाचे वारस हिरावून घेऊन अख्खे कुटुंब कोविडने फस्त केले.असे असतांना सावध पवित्रा घेत, आहे त्याच ठिकाणी राहून, स्वातंत्र्याचा उत्सव पार पाडण्यात आला. गाव तेथे ध्वजारोहण तेही पाच लोकांत साजरे करण्यात आले.निर्बंध असले तरी देशातुन कोविड विषाणूची बाधा निघून जावी यासाठी प्रार्थना देखील करण्यात आलेली आहे. शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्याविना ध्वजारोहणाचा कार्यक्रम पहिल्यांदा पार पडला आहे.भारत कृषी प्रधान देश असून मोठ्या थाटामाटात शेतकरी बांधव पोळा सण साजरा करतात. बैलास सजवून गावाच्या आखरावर,पारावर आंब्याच्या पानाच्या पताका लावून बैलांचा नवरदेवासारखे सजवून मिरवणुकीत नेतात. दुस-या दिवस मारबत म्हणून साजरा करतात. काही ठिकाणी जत्रा, जलसा,मिरवणुका, धार्मिक परंपरा जपल्या जातात. यावर देखील कोविड विषाणूने लगाम घालण्यास शासन-प्रशासनास बंधने घालण्यास लावले आहे. या पुढे गणेश उत्सव, शारदा-दुर्गा उत्सव घरातच अगदी साधेपणे फिजिकल अंतर राखून, नियमांचे पालन करूनच राष्ट्रीय सण उत्सव पार पाडले जाणार आहे.आगामी सण ऊत्सवात फिजिकल डिसटन्स ठेवुन आणी शासकिय नियमांचे पालन करुनच साजरा करावा लागणार असल्याने प्रत्येक सणऊत्सवावेळीचा आनंदावर विरजन पडणार आहे.सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आपला आनंद बाजुला ठेवुन शासकीय नियमाचे पालन करुनच सर्व सुरळीत पार पाडन्याचीही आता गरज निर्माण झाली आहे.

फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

मो.8459273206

9763007835

Updated : 15 Aug 2020 7:43 AM GMT
Next Story
Share it
Top