Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > स्वयं शिक्षण प्रयोग करून सेंद्रिय शेतीचे धडे घेऊन शेती पूरक व्यवसाय निर्मिती

स्वयं शिक्षण प्रयोग करून सेंद्रिय शेतीचे धडे घेऊन शेती पूरक व्यवसाय निर्मिती

स्वयं शिक्षण प्रयोग करून सेंद्रिय शेतीचे धडे घेऊन शेती पूरक व्यवसाय निर्मिती
X

आकाश लश्करे

उस्मानाबाद

गौर ,ता. निलंगा ,जि -लातूर येथे राहणा-या सौ अर्चना तावडे मुळ ग्रहणी शेतीत वगैरे जाणं हे तर दूरचीच गोष्ट त्यांना एकूण शेती दोन एकर 30 गुंठे आणि त्यामध्ये ही नगदी पीक घेत असल्याने शेती नफा व तोटा बरोबरच असायचा.

त्यानंतर त्या स्वयं शिक्षण प्रयोग यास संस्थेच्या सखी अन्नसुरक्षा शेती या कार्यक्रमांतर्गत कृषी संवाद सहाय्यक म्हणून काम करू लागल्या काम करू लागल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की शेती स्वतः केली तर फायद्याचे असते आणि बांधावरून जर शेती केली तर तिच्यात कधीच नफा होणार नाही. सेंद्रिय शेती करण्याचे वेगवेगळे धडे स्वयं शिक्षण प्रयोग च्या वेगवेगळ्या ट्रेनिंग मधून मिळाले आणि त्यांनी स्वतः शेती करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला मिश्र पीक पद्धतीने शेती केली व सहा पिकांची पेरणी केल लि. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की यातील एखाद पीक जरी हवामानामुळे वातावरणामुळे निघालं नाहीतरी बाकी चार पिक आपल्याला चांगले उत्पन्न देणार आहेत आणि हे त्यांच्या घरच्यांनाही पटलं त्यानंतर त्यांनी भाजीपाला कडधान्य धान्य सर्वाचा अंतर्भाव करून एकूण 23 पिकाची पेरणी केली आणि त्यासाठी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला गांडूळ खत खत म्हणून वापरला त्याचबरोबर दशपर्णी व लिंबोळी अर्क फवारणीसाठी घरी तयार केलेले आणि स्वतःहून गावामध्ये डेमो फॉर्म तयार केला तोफान पाहण्यासाठी गावातील महिला गटाच्या बैठकीच्या अंतर्गत शेतावर येऊन पाहणी करू लागल्या आणि अल्पभूधारक महिलांनी सुद्धा त्याचा अवलंब करण्यास सुरुवात केलं आता त्यांचे घरचे ही त्यांना प्रोत्साहन देत आहेत. आणि त्यातूनच त्यांनी आता दशपर्णी घरी तयार करून विक्रीसाठी बॉटल तयार करून विकत आहेत. त्यांचं मार्केट हे गावांमध्ये तयार झाला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांना दशपर्णी ची मागणी येत आहे. एक लिटर दशपर्णी त्या दीडशे रुपयाला देतात आणि त्यांचा उदरनिर्वाह आहात त्याचा थोडा हातभार लागत आहे. त्याच बरोबर त्या आता दहा महिलांना सोबत घेऊन दशपर्णी चे ड्रम लावणार आहेत व त्याची लेबलिंग व पॅकिंग करून बाजारामध्ये विक्रीसाठी ठेवणार आहेत हे त्यांचं पुढील काळातील प्लॅनिंग आहे.

Updated : 26 July 2020 6:26 PM GMT
Next Story
Share it
Top