Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > सौ. शितल सावळे न्यायासाठी शेवटी बसल्या सहपरिवारासह आमरण उपोषणाला

सौ. शितल सावळे न्यायासाठी शेवटी बसल्या सहपरिवारासह आमरण उपोषणाला

सौ. शितल सावळे न्यायासाठी शेवटी बसल्या सहपरिवारासह आमरण उपोषणाला
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

साहेब माझ्या पतीचे पैसे कधी परत मिळणार या मथळयाखाली वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली होती. सौ. शितल सावळे रा. बोर्टा यांना शेवटी न्याय न मिळाल्यामुळे सहपरिवारासह उपोषणाला बसविण्याची वेळ आली. या अगोदर दि. 12/11/2020 व दि. 19/11/2020 ला मा . श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, म.रा. तक्रार केली होती. परंतू त्या तक्रार अर्जावर आजरोजी सुद्धा कारवाई झाली नसल्यामुळे मी दि. 23/11/2020ला आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या कार्यालयासमोर माझ्या संपुर्ण परिवारासह दुपारी ४ वाजतापासुन आमरण उपोषणाला बसणार आहे. अशा आशयाचे पत्र त्यांनी मा . श्री. उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, म.रा. हयांना दिले आहे. या पत्रामध्ये 1) आमदार श्रीकांत देशपांडे, रा. दस्तुर नगर, अमरावती 2) श्री. संजयसिंग राजपुत, रा. वडरपुरा, मुर्तिजापूर 3) श्री. रविंद्र जायले, बँक कॉलनी, सिरसो, ता. मुर्तिजापूर जि . अकोला विषय माझे पती पंकज ओंकार सावळे यांची या तिन्ही गैरअर्जदारांनी मिळुन पैशाची व्यवहारामध्ये फसवणुक केली असल्यामुळे माझ्या पतीला न्याय मिळण्याकरीता मी व माझ्या दोन लहान मुली व सोबत माझ्या पतीला घेवुन आमदार श्रीकांत देशपांडे अमरावती यांच्या कार्यालयासमोर दि. 23/11/2020 रोजी दुपारी 4 वाजता आमरण उपोषण सुरु केले आहे . कृपया याची नोंद घ्यावी. तसेच उपोषणादरम्यान माझ्या परिवाराच्या जीवाला धोका असल्यामुळे मला व माझ्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे. कारण की, आमदार देशपांडे, संजयसिंग राजपुत आणि रविंद्र जायले व त्यांच्या समर्थकांकडून माझ्यावर व माझ्या परिवारावर जीवघेणा हल्ला होऊ शकते. या अगोदर दि. 12/11/2020 ला संजयसिंग राजपुत यांनी माझे पती पंकज सावळे यांना मोबाईल फोनवरुन जीवे मारण्याची व मुर्तिजापूर शहरात तुला राहायचे नाही का ? अशी धमकी दिली. याची रेकॉर्डीग माझ्या पतीकडे आहे. करीता मला व माझ्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्यात यावे , हि नम्र विनंती. करीता आपल्या माहितीस व उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर. असा उल्लेख असून या पत्राच्या प्रतिलिपी मा. अनिलजी देशमुख साहेब, गृह मंत्री, म.रा., मा. यशोमती ठाकुर मॅडम, पालकमंत्री, अमरावती, मा. बच्चुभाऊ कडू, पालकमंत्री, अकोला, मा. विभागीय आयुक्त साहेब (महसुल), अमरावती विभाग, अमरावती, मा. जिल्हाधिकारी साहेब, अमरावती, मा. पोलीस महानिरिक्षक साहेब, अमरावती विभाग, अमरावती, मा. पोलीस आयुक्त साहेब, अमरावती शहर, मा. उपविभागीय अधिकारी साहेब, मुर्तिजापूर, मा. पोलीस निरिक्षक साहेब, मुर्तिजापूर यांना दिल्या आहेत.

मुर्तिजापुर प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन 9850024474

Updated : 24 Nov 2020 7:07 PM GMT
Next Story
Share it
Top