सिरोंचा तालुक्यातील बामणी प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक समस्या तहसीलदार कडे निवेदन
X
बामणी :- प्राथमिक आरोग्य केंद्र बामणी येथे अनेक समस्या आहेत असता त्या ठिकाणी अनुउपस्थिती जास्त पहायला मिळाले. वेळेवर डाँक्टर नसतो नर्स सुट्टीवर जावुन असते बेड नाही बरोबर कम्पोडर तीन चार दिवसांनी येतो..स्वच्छतेचे व आरोग्याचे दज्जीया उडाले असे त्यानं गावकऱ्याना दिसून आले.परिस्थिती गंभीर स्वरूपाची आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची मागणी हेच आहे की पूर्ण वेळ देणारा डाँक्टर आम्हाला पाहिजे. ग्रामीण भागातुन उपचारासाठी येणारे गरीब लोक त्यांना चांगला प्रकारे औषधी मिळला पाहिजे व उपचार भेटला पाहिजे या दृष्टीकोनातून तात्काळ बामणी प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सुविधा उपलब्ध करून द्यावी अन्यथा आम्ही ताला ठोकू..आज बामणी येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच रा. काँ. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सिरोंचा तहसील तहसीलदार श्री रमेश जसवंत यांना निवेदन देवून मागणी केली आहे.
यावेळी उपस्थित संजीवकुमार मेडी,महेश मेडी,प्रभाकर कोनम,रमेश बेडकी,कुमरम पोचम,तिरुपती अल्लूरी,देवराज अल्लूरी,कावरे पोचम,केशव मडावी,कोरके वेलादी,वेल्ल वेलादी,सडवली येनके,कुशाल पंदरम,उपस्थित होते.
सिरोंचा प्रतिनिधी साईनाथ दुर्गम