Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > साहेब माझ्या पतीचे पैसे कधी परत मिळणार – शितल सावळे

साहेब माझ्या पतीचे पैसे कधी परत मिळणार – शितल सावळे

साहेब माझ्या पतीचे पैसे कधी परत मिळणार – शितल सावळे
X

म मराठी न्यूज टीम

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 12/11/2020

तसे पाहता राजकीय पदाच्या उच्च स्थानावर आरुढ असलेले तथा जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आपल्या पदाचा दुरुपयोग करुन सामान्य जनतेला फसविण्याचा प्रकार तसा नवा नाही. आपल्या पदाचा दुरुपयोग करुन सुध्दा असे लोकप्रतिनिधी सामान्य जनतेला विनाकारण त्रास देतात. अशातलाच एक प्रकार मुर्तिजापुर शहरामध्ये समोर आला आहे.

तालुक्यातील बोर्टा येथील रहिवाशी सौ शितल सावळे यांनी त्यांच्या पतीला आमदार श्रीकांत देशपांडे, रा. दस्तुर नगर, अमरावती, संजयसिंग राजपुत, रविंद्र जायले रा. मुर्तिजापुर यांच्याकडून होणाऱ्या त्रासाबाबत मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले.

माझे पती पंकज ओंकार सावळे यांची वरील तिन्ही गैरअर्जदारांनी मिळुन पैशाची व्यवहारामध्ये फसवणुक केली असल्यामुळे माझ्या पतीला न्याय मिळण्याकरीता मी व माझ्या दोन लहान मुली व सोबत माझ्या पतीला घेवुन आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या कार्यालयासमोर दि. 23/11/2020 रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे. या विषयान्वये दिलेल्या निवेदनामध्ये मी आपणास विनंतीपुर्वक तक्रार अर्ज सादर करते की, माझे पती मुर्तिजापूर येथे पाणी फिल्टर मशीन विकण्याचा व्यवसाय करतात. संजयसिंग राजपुत, रविंद्र जायले यांनी माझ्या पतीला काम देतो. म्हणून श्रीकांत देशपांडे यांचेकडे ऑगस्ट 2016 मध्ये घेवुन गेले. श्रीकांत देशपांडे यांनी त्यांच्या आमदार कोठ्याच्या निधीमधुन काम देण्याचे कबुल केले. परंतु त्यासाठी आमदार श्रीकांत देशपांडे साहेबांनी माझ्या पतीला नगदी तीन लाख व कार्यालयाकरीता साहित्य मागीतले. त्यानुसार माझ्या पतीने तीन लाख रुपये नगदी व 52 हजार रुपयाचे साहित्य दिले. एवढे पैसे दिल्यानंतरही माझ्या पतीला आमदार श्रीकांत देशपांडे, अमरावती यांनी कोणत्याही प्रकारचे काम दिले नाही. म्हणून माझ्या पतीने आमदार कोठयातल्या निधीतुन काम मिळण्याकरीता दिलेले पैसे आणि साहित्य याचे पैसे परत मागण्यास सुरुवात केली. आमदार श्रीकांत देशपांडे यांनी अमरावतीला माझ्या पतीला गेल्या 4 वर्षापासुन शंभर वेळा बोलावुन सुद्धा माझ्या पतीकडुन घेतलेले पैसे परत केले नाही. जेव्हा मी माझ्या पतीला विचारले की तुम्ही एवढ्या वेळा अमरावतीला कशासाठी जाता तेव्हा त्यांनी मला आमदार श्रीकांत देशपांडे व शहरातील दोन शिक्षक यांनी कशाप्रकारे फसवणुक केल्याची संपुर्ण माहिती मला दिली. तेव्हा मला या तिन्हीं गैरअर्जदारांच्या विरुद्ध तक्रार देण्याचा मार्ग स्विकारावा लागला. जर आमदार श्रीकांत देशपांडे आणि संजयसिंग राजपुत, रविंद्र जायले यांनी माझ्या पतीचे तात्काळ नगदी पैसे व साहित्याचे पैसे असे एकुण तीन लाख बावन्न हजार (3,52,000/-) रुपये परत न केल्यास दि. 23/11/2020 पासुन आमदार श्रीकांत देशपांडे यांचे कार्यालय वॉलकर कंपाऊंड, अमरावती येथे मी व माझ्या ३ वर्षाच्या लहान मुली व पती सोबत आमरण उपोषणाला बसणार आहे. असा निवेदनामध्ये उल्लेख असून त्यांच्या प्रतिलिपी मा. यशोमती ठाकुर मॅडम, पालकमंत्री, अमरावती, मा. बच्चुभाऊ कडू, पालकमंत्री, अकोला, मा. विभागीय आयुक्त साहेब, (महसुल), अमरावती विभाग, अमरावती, मा. पोलीस आयुक्त साहेब, अमरावती शहर, मा. उपविभागीय अधिकारी साहेब, मुर्तिजापूर, मा. पोलीस निरिक्षक साहेब, मुर्तिजापूर यांना दिलेल्या असून सोशल मिडियाव्दारे सुध्दा पाठविलेल्या आहेत. अशी माहिती सौ. शितल सावळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली.

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113

Updated : 12 Nov 2020 12:56 PM GMT
Next Story
Share it
Top