साहेब दर्यापूर ते मुर्तिजापूर नविन झालेल्या रस्त्यावर गतीरोधक टाका – संजय नाईक
X
म मराठी न्यूज टीम
मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 17/11/2020
नव्याने तयार झालेल्या दर्यापुर ते मुर्तिजापुर रस्ता मृत्युचे व्दार बनत आहे. अशा जीव घेणाऱ्या रस्त्यावर गतीरोधक टाकण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे मुर्तिजापुर तालुकाध्यक्ष संजय नाईक यांनी केली आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अधिकारी, मुर्तिजापूर यांना दिलेल्या निवेदनामध्ये आपल्या कार्यातया मार्फत दर्यापूर ते मुर्तिजापूर नवीन बनत असलेल्या रोडवर सिरसो फाटा, श्रीरामनगर, पुंडलिकनगर व 7 नंबर नाका चौक येथे गतिरोधक टाकणे अतिआवश्यक आहे. त्या रोडवर विदर्भाचे दैवतं परमहंस पुंडलिक महाराज देवस्थान वा तपी हनुमान देवस्थान असल्यामुळे भाविकांची हजारोच्या संख्येने येजा असते. तसेच त्या रोड लगत जि.प. शाळा असून रोडच्या दोन्ही बाजूला रहिवाशी दाट लोकवस्ती आहे. विशेष बाब म्हणजे दोन राज्यांना जोडणारा महामार्ग असल्याने तसेच दोन जिल्हयांना सुध्दा जोडणारा असल्याने या रस्त्याने सर्व प्रकारच्या वाहनांची मोठया प्रमाणात ये-जा असते. आज पावेतो बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल रोजी झालेल्या अपघातामध्ये सुध्दा ७ नंबर नाका येथे अपघात झाला असून अपघातात एक व्यक्ती जागीच मृत्यू पावला असून एक गंभीर जखमी झाला आहे. पुढील अपघात टाळण्याकरिता गतिरोधक टाकण्यात यावे हि विनंती केली आहे. जर येत्या ८ दिवसात गतिरोधक न झाल्यास वचित बहुजन आघाडी तर्फे त्या रोडवर ठिष्या आंदोलन करण्यात येईत व त्यास जबाबदार आपले प्रशासन असेल. असा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदन देते वेळी मोहन वसुकार, सचिन दिवनाळे, संतोष गणेशे, तसवर खान, नकुल काटे व आदि कार्यकर्त उपस्थित होते.