Home > विदर्भ > साहेब आाम्हा नाभिक समाजाला न्याय दया – भावेश दिनेशभाई झाला

साहेब आाम्हा नाभिक समाजाला न्याय दया – भावेश दिनेशभाई झाला

साहेब आाम्हा नाभिक समाजाला न्याय दया – भावेश दिनेशभाई झाला
X

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मुर्तिजापुर तालुका कार्यकारणीने मुख्यमंत्रयांना निवेदनाव्दारे व्यक्त केल्या आपल्या व्यथा

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- मागील 6 महिन्यापासून सुरु असलेलया कोरोना विषाणूच्या महामारीमुळे उभ्या असलेल्या संकटांचा सामना सर्व जण करित आहे. याची झळ नाभिक समाजाला जास्त भोगावी लागली असून सध्यास्थितीत सुध्दा हया परिस्थितीचा सामना करित आहे.

नाभिक समाजाला न्याय मिळणे बाबत या विषयान्वये महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मुर्तिजापुर तालुका कार्यकारणीने जिल्हा अध्यक्ष संजय गोविंदभाई भटृटी यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत आपल्या व्यथा व मागण्या दिलेल्या निवेदनाव्दारे व्यक्त केल्या आहेत. निवेदना मध्ये कोरोना विषाणूच्या महामारीच्या काळात गेल्या मागील पाच महिन्यात सर्वात मोठे संकट नाभिक समाजावर आलेले आहे . आता पर्यत नाभिक समाजातील 12 युवकांनी आत्महत्या केल्या असुन नाभिक व्यवसाय 25% वर येऊन ठेपला आहे . नाभिक समाज उपासमारीला तोंड देत असतांना सुध्दा सोशल मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे झालेल्या बदनामीला सामोरे जात आहे. अशा परिस्थितीमध्ये नाभिक समाजाने शासनाला आज पावेतो अनेक निवेदने दिलेली आहे. परंतू आज पर्यंत शासनाने नाभिक समाजाच्या निवेदनाची कुठल्याही सवरुपाची दखल न घेता त्यांच्या निवेदनांना केराची टोपली दाखविली आहे. तसेच आत्महत्या ग्रस्त कुटूंबा बद्दल शासनाने घेतलेल्या असंवेदनशीलतेमुळे नाभिक समाजाच्या भावाना दुखावल्या गेल्या असून शासनाने आत्महत्याग्रस्त कुंटुंबावर व नाभिक समाजाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तसेच आमच्या 1. आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 10 लाख रुपयाची मदत करण्यात यावी . 2. 26 मार्च 1979 रोजी राज्य शासनाने केंद्र सरकारला केलेल्या शिफारशी नुसार नाभिक समाजाला अनुसुचीत जाती मध्ये समाविष्ट करण्यात यावे. 3. लॉकडाऊन सुरु झाल्यापासुन सलून व्यावसायिकाला दरमहा 10,000 / - रु . मदत मिळावी. 4. सलुन व्यावसायिकांना 50 लाख रु . विमा संरक्षण देण्यात यावे. 5. सलून व्यावसायिकांचे लॉकडाऊनमधील विजबील माफ करण्यात यावे. 6. सलून व्यावसायिकांना संपुर्ण काम करण्याची परवानगी द्यावी . हया मागण्या केल्या असून या मागण्यांबाबत 15 दिवसाचे आत खालील मागण्याच्या बाबतीत निर्णय घ्यावा व नाभिक समाजाला न्याय द्यावा.

जर आपण आमच्या मागण्यांना न्याय दिला नाही तर संपुर्ण राज्यभर नाभिक समाज तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ व त्यामुळे राज्यात तणावपुर्ण वातावरण निर्माण झाल्यास व नाभिक समाजातील कोणाच्या जिविताची हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहीन. असे नमुद आहेत. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे मुर्तिजापुर तालुका अध्यक्ष भावेश दिनेशभाई झाला, शशिकांत खंडारे-तालुका उपाध्यक्ष, अनिल बेलाडकर-तालुका सचिव, संतोष रुद्रकार (समाजसेवक),अनुप दहिहांडेकर, इशाक सलमानी व इतर पदाधिकारी व कार्यकर्त हजर उपस्थित होते.

भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113

Updated : 8 Sep 2020 8:24 PM GMT
Next Story
Share it
Top