Home > विदर्भ > साहेब आमच्या घराजवळच्या नाल्या कधी साफ होतील हो …………….

साहेब आमच्या घराजवळच्या नाल्या कधी साफ होतील हो …………….

साहेब आमच्या घराजवळच्या नाल्या कधी साफ होतील हो …………….
X

म मराठी न्यूज टीम - मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन दि. 31/10/2020

गेल्या 9 महिन्यापासून कोरोना विषाणू ची धास्ती मनात बाळगून कसे तरी आपले जीवन जगत आहे. या महामारी मध्ये काहींना तर आपले प्राण सुध्दा गमवावे लागले. यातच आता भर पडली आहे अस्वच्छतेची, दुर्गंधी ची. यामुळे डेंग्यू व इतर आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे पाहता स्वच्छ भारत मिशन फक्त मुख्य रस्त्यांवरच दिसते. दिल्ली ची स्वच्छता गल्ली मध्ये पहायला मिळणार नाही. हीच परिस्थिती मुर्तिजापुर येथील जुनी वस्ती परिसरातील पोळा चौकातील गल्ल्यांमध्ये पहावयास मिळाली. शहरामध्ये डेंग्यू, टायफेड च्या रुगणांमध्ये दिवसे दिवस वाढ होतच आहे. जंतूनाशक ची फवारणी फक्त फोटो घेण्याकरिता व प्रसिध्दी मिळविण्याकरिता करण्यात येतात. ती पण मुख्य रस्तयांवरच गल्लयांमधील लोक मेले तरी चालतात. एक तर त्यांना आपल्या पोटाची भुक भागविण्याकरिता धवपळ करावे लागते. त्यातच जर कुणी आजारी पडले तर त्यांच्या समोर मोठा यक्ष प्रश्न निर्माण होतो.

विशेष बाब म्हणजे दुसऱ्या, तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये काही स्वंयसेवी संस्थानी नगर परिषदे मध्ये जंतुनाशका ची मागणी केली होती. परंतू तेथे जंतुनाशक उपलब्ध नसल्याची गंभीर स्थिती या कोरोना मुळे नागरिकां समोर आली. परंतू मुर्तिजापुर शहरातील एकाही लोकप्रतिनिधीने यावर आवाज न उचलता, स्वखर्चाने फवारणी करुन प्रसिध्दी मिळविण्याचे काम केले.

नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी तथा लोकप्रतिनिधी या बाबी कडे दुर्लक्ष करतांना दिसून आले आहेत. त्यांचा दौरा किंवा पाहणी झाली तर ती फक्त मुख्य रस्तयांची, कारण आत मध्ये दुर्गंधीमुळे येणाऱ्या वासामुळे त्यांना आजारी पडण्याची भिती वाटते. अशी यांची नागरिकांन प्रति कर्तव्यनिष्ठा. त्यातच मुर्तिजापुर शहराचे स्टेशन विभाग आणि जुनी वस्ती असे दोन भाग पडतात. स्टेशन विभागाच्या विकासाकडे जास्त लक्ष दिल्यात जाते. कारण नगराध्यक्षांचे निवासस्थान स्टेशन विभागा मोडते. तर जुनी वस्ती परिसरातील लोकप्रतिनिधींना किती वेळा सांगा, परंतू

त्यांना स्वच्छतेचे, साफसफाईचे काही घेणे देणे नाही. फक्त योजना आल्या की, याचा लाभ घ्या-त्याचा लाभ घ्या. त्यामध्ये सुध्दा पुर्णत: येत नाही. एक वेळा हवा गेली की गेली. अशा परिस्थिती मध्ये नागरिकांनी साहेब आमच्या घराजवळच्या नाल्या कधी साफ होतील हो ……………. आर्त साद मुर्तिजापुर नगर परिषदेचे आरोग्य अधिकारी तथा लोकप्रतिनिधींना दिली आहे.

प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113

Updated : 31 Oct 2020 5:12 PM GMT
Next Story
Share it
Top