सालमारा येथील पांदन रस्तेवरील पुलिया पुराच्या पाण्यामुळे खचला.
X
"सालमारा येथील पांदन रस्तेवरील पुलिया पुराच्या पाण्यामुळे खचला."
म-मराठी न्यूज नेटवर्क
दिवाकर भोयर
धानोरा प्रतिनिधी
मो. 9421660523
गडचिरोली/आरमोरी :- रहदारी बंद झाल्याने तात्काळ प्रशासनाने दुरुस्ती करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी केली आहे.
आरमोरी तालुक्यातील सालमारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळे जवळील शेतशिवारात जाणारा पांदन रस्तेवरील नाल्यावर असलेला पुलिया या वर्षीच्या अतिवृष्टीच्या अवकाळी पावसामुळे एका बाजुच्या साईडणे पुर्णपणे मातीसहीत पुणं साहीत्य वाहुण गेल्याने शेतकऱ्यांना आता धान पिक कापण्यास किंवा धान चुरण्यात जड वाहण नेताच येत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण निर्माण झाली असल्यामुळे प्रशासनाने तात्काळ नाल्याचा पुलियाची दुरस्ती करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
जोगी साखरा गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सालमारा येथील शेतकऱ्यांचे शेत मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळुन जाणाऱ्या कच्चा पादंन रस्ते लगत नाल्याच्या समोर शेती असल्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या पावसाच्या दिवसात चिखलातुन जाण्याची वेळ येत असताना हि समस्या वारंवार लाऊन धरल्याने प्रशासनाने ग्रामिण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदन रस्तेवर माती काम व नाल्यावर पुलिया बांधकाम जि.प.बाधकाम विभागाच्या वतीने पुलिया करण्यात आला परंतु या वर्षी अतिवृष्टीच्या अवकाळी पावसाने पुलिया समोरील एका बाजुची माती गिटी वाहुन गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या जाण्यायेण्याच्या मार्गावर पुणता खडाच पडल्याने शेतकऱ्यांना शेतात पिकलेले धान पिक घरी खडे पडल्यामुळे आणताच येत नसल्यामुळे पिकच तर जागिच राहीलना या भितीने शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या कडे धाव घेऊन समस्या सांगितले असता याची दखल घेऊन स्वंता घोडाम यांनी सालमारा गाढुन पुलियाची पाहणी करुण सालमारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळुन जाणाऱ्या पांदण रस्तेवरील पुलिया ची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम याच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यावेळी गंगाधर कुमरे.राहुल वाघ निकेश धारणे.रोहीत रायशिडाम आदि उपस्थित होते.