Home > विदर्भ > सामान्य मानसाला केंन्द्र बिंन्दु ठेवून विकास कामाचे नियोजन करा . जिल्हा परिषद अध्यक्ष अजय ककंडलवार

सामान्य मानसाला केंन्द्र बिंन्दु ठेवून विकास कामाचे नियोजन करा . जिल्हा परिषद अध्यक्ष अजय ककंडलवार

सामान्य मानसाला केंन्द्र बिंन्दु ठेवून विकास कामाचे नियोजन करा . जिल्हा परिषद अध्यक्ष अजय ककंडलवार
X

दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523

. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना जिल्हापरिषद अंतर्गत पंचायत समिती स्तरावरुन मोठ्या प्रमाणात राबविल्या जातात सामान्य नागरीक केंन्द्र बिंन्दु ठेवून विकास कामाचे नियोजन करा.असा महत्वपुर्ण सल्ला देतांना लोकांच्या सहकार्यामधून समन्वयातून काम करा असे आवाहन जिल्हापरिषद गडचिरोलीचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. पंचायत समिती धानोराचे सभागृहात ६आँगष्ट रोजी आयोजित आढावा सभेच्या अध्यक्ष स्थानावरुण ते बोलत होते.सभेला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी ,पंचायत समिती सभापति अनुसयाताई कोरेटी ,जि.प.सदस्य राजूभाऊ जिवानी ,जि.प.सदस्य विनोद लेनगुरे ,जि.प.सदस्य लताताई पुंघाटे ,उपसभापती विलास गावळे ,संवर्ग विकासअधिकारी बंडू निमसरकार ,आदी मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारी संदर्भात तालुक्यातिल स्थिती पासून सुरु केलेली सभा ,शासनाच्या विविध कल्याणकारी योजनावर विस्तृत चर्चा करून उपस्थित अधिकाऱ्यांवर प्रश्नाचे भडिमार करित अध्यक्षानी अधिकार्‍याची भंबेरी उडविली.जिल्हा परिषदेच्या कामकाजवर वचक असलेल्या आणि कर्तृत्व व वकृत्व आणि नेतृत्वाची झलक दाखवून विविध योजनाचा पाढाच अध्यक्षानी दाखविल्याने उपस्थित मंञमुग्ध झाले.जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटिल पोरेटी यांनी व उपस्थित जि.प.सदस्यानी सुद्धा सभेत विविध योजनाची माहीति सर्व सामान्या पर्यन्त पोहचत नसून खरे लाभार्ती वंचित असल्याची खेद व्यक्त केली. सभेत आरोग्य विभाग ,कृषि विभाग ,बांधकाम विभाग,जलसिंचन विभाग,शिक्षण विभाग,पशुसंवर्धन विभाग,बाल विकास विभाग ,ईत्यादी विभागवार माहीती विषयी विस्तृत चर्चा करण्यात येऊन तालुक्यातिल ग्रामपंचायती अंतर्गत कामाचा आढावा घेण्यात आला.अध्यक्षांनी अधिकाऱ्यांच्या समस्या व अडचणी सुद्धा जाणून घेतल्या .कामात कुचराई करणार्‍याची गय केल्या जाणार नाही.अशी तंबी सुद्धा अध्यक्षानी दिली.विकासाच्या नावावर येणाऱ्या योजनाप्रती दक्ष राहून ,नियोजन करावे.असे अधिकार्‍याना निर्देश दिले.सभेला विभाग निहाय अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.गाव विकासाचा दुवा समजला जाणारे ग्रामसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सभेचे संचालन पंचायत समितीचे विस्तार अधिकारी लुमदेव जुवारे यांनी केले .तर आभार ग्रामसेवक खुशाल नेवारे यांनी मानले.

Updated : 8 Aug 2020 5:30 AM GMT
Next Story
Share it
Top