सर्पदंशाने मार्कंडादेव येथील शेतकऱ्याचा मृत्यू
प्रा,संतोष सुरपाम जिला प्रतिनिधी 9420190877
गडचिरोली: मार्कंडादेव ::
स्वत : च्या शेतात धानाचे भारे बांधणीचे काम करीत असतान विषारी सापाचा दंश झाल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटन गुरूवार १ ९ नोव्हेंबरला घडली . शंकर काशीनाथ धोटे ( ३२ ) रा . मार्कंडादेव असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे शेतकरी शंकर धोटे हे गावालगत असलेल्या आपल्या शेतात धान बांधणीच्या कामाकरिता शनिवार १४ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गेले होते . धानाची बांधणी करीत असतान कडपाखाली असलेल्या विषारी सापाने त्यांच्या पायाला दंश केला . सुरुवातील त्यांनी गावातच उपचार घेतला . परंतु चार दिवसांनी प्रकृती खालावल्याने त्यांन गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले . परंतु त्यांनी उपचाराला प्रतिसाद दिला नाही . गुरूवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली , आई असा आप्तपरिवार आहे