Home > विदर्भ > सर्जा राजाची घरीच पूजा कोरोनामुळे यंदा घुंगरमाळ जणू मुकी

सर्जा राजाची घरीच पूजा कोरोनामुळे यंदा घुंगरमाळ जणू मुकी

सर्जा राजाची घरीच पूजा कोरोनामुळे यंदा घुंगरमाळ जणू मुकी
X

रितेश भोंगाडे/ राळेगाव :-

दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा शेतकऱ्यांचा सण बैल पोळा हा यंदा घरातच साजरा करण्यात आला प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत यंदा बैलाच्या मिरवणुका रद्द करण्यात आल्या श्रावण महिन्यात सण उत्सवांची रेलचेल असते श्रावणातील पिठोरी अमावस्येला बैलपोळा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र यंदा या सणावर कोरोनाचे सावट दिसून आले आहे.

शेतकरी वर्गाचा सर्वात मोठा सण म्हणजे बैल पोळा पोळ्याच्या अगोदर पंधरा दिवस हा सण साजरा करण्यासाठी बळीराजा मोठी तयारी करत असतो लाडक्या सर्जा राजाचा उत्सव आनंदाने साजरा करण्याची कित्येक वर्षांची परंपरा आहे परंतु यावर्षी आनंदावर कोरोनाने विरजण पडले व लाडक्या सर्जा राजा उत्साहाचा सण साजरा करता आला नाही. गावातील मिरवणुका रद्द कोणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आणि तालुका प्रशासनाच्या वतीने बैलाच्या मिरवणुका काढू नये एकाच ठिकाणी कुठली गर्दी करू नये यंदाचा बैलपोळा हा सण घरोघरी साजरा करावा फिजिकल डिस्टन चे पालन करत हा सण साजरा करावा असे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी पशुपालकांनी आपल्या घरी सण साजरा केला मिरवणूक काही रद्द केल्या अतिशय साधेपणाने यंदाचा सण साजरा झाला.

Updated : 19 Aug 2020 12:45 PM GMT
Next Story
Share it
Top