Home > विदर्भ > सरपंच / ग्रामसेवकाच्या वादात - नाली उपसा ठेकेदाराचा बळी !

सरपंच / ग्रामसेवकाच्या वादात - नाली उपसा ठेकेदाराचा बळी !

सरपंच / ग्रामसेवकाच्या वादात - नाली उपसा ठेकेदाराचा बळी !
X

४,९८००० रूपये भिसी ग्रा. पं. कडून ठेकेदारास देण्यास टाळाटाळ

पत्रपरिषदेत ठेकेदाराचा आरोप

भिसी :- अनिल रेवतकर , प्रतिनिधी

भिसी :-- येथील बहूचर्चेत असणारी माडेल ग्राम पंचायत अनेक कारणांमुळे गाजलेली आहे. चिमूर तालुक्यातील नावाजलेली भिसी ग्राम पंचायत ,एका माडेल रूपात देखील देखनी आहे....

अशा माडेल भिसी ग्राम पंचायतच्या सरपंच आणि ग्रामसेवकाच्या वादात भिसी येथील नाली उपसा ठेकेदार भरडला जात आहे.

करारनाम्यानुसार भिसी ग्राम पंचायतीने मासीक सभा ठराव क्रं. ६, दि.२७/२/२०२० अन्वये १४/३/२०२० रोजी झालेल्या लिलावास अधिन राहून ग्राम पंचायत भिसी अंतर्गत ६ वार्डाचा संपूर्ण गटाराच्या उपसा करणे, मलबा वाहतुक करून गावाबाहेर विल्हेवाट लावणे,करीता अटी- शर्तीचे पालन करून सदर काम ४,९८००० रकमेस मंजुर करून करारनामा लिहून घेतला .

सदर ठेकेदार जितेन्द्र मुरलीधर ठोंबरे यांनी भिसी येथील संपूर्ण वार्डातील मलबा नाली उपसा काम पूर्ण केले. परंतू करारनाम्यानुसार ठरलेल्या रकमेपैकी एकही रूपया सदर ठेकेदारास भिसी ग्राम पंचायतीने दिलेला नाही. त्यामुळे ठेकेदार आणि मजुर आर्थिक टंचाईचा सामना करीत आहे.

भिसी ग्राम पंचायतीचे उपसरपंच लिलाधर बनसोड यांनी मला सदर कामाचे बिल हवे असेल तर ५००० हजाराची मागणी केली. १७/५/२०२० रोजी मी पाच हजार भिसीच्या उपसरपंचाला दिले असे लेखी निवेदनाद्वारे प्रेस नोट मध्ये सदर ठेकेदाराने आरोप केला आहे.त्या आरोपांचे खंडन करून उपसरपंच लिलाधर बनसोड यांनी मी पैसे घेतले नसल्याचा खुलासा सदर प्रतिनिंधीन समोर केला.

नाली उपसा ठेकेदाराचे पैसे का देण्यात आले नाही ? असे सरपंचास विचारले असता सरपंच सौ योगिता अरून गोहणे,यांनी ग्रामसेवकाच्या दिरंगाई मुळे ठेकेदाराचे पैसे अडल्याचे सांगितले.तर भिसीचे ग्रामसेवक अनिरुद्ध शेंन्डे यांनी ठेकेदाराचे पैसे द्यायचे असल्यास ग्राम पंचायतीची मासीक मिटींग घेऊन ठराव घेणे गरजेचे आहे. असे ग्रामसेवक म्हणतात ,तर दुसरीकडे सरपंच व उपसरपंच म्हणतात नाली उपसा ठेकेदाराचे पैसे देण्यास ग्राम पंचायत ची मिटींग घेण्याची गरज नाही.

अशा दुहेरी विळख्यात नाली उपसा ठेकेदार सापडल्याने पैशाविना बळी ठरलेला आहे.....!

त्यामुळे नाली उपसा करणाय्रा मजुरांची मजुरी कशी द्यावी अशा दोघांच्या ( ग्रामसेवक/ सरपंचाच्या ) कात्रीत सापडलेल्या ठेकेदारानी आपली व्यथा लेखी प्रेसनोट व्दारे पत्रकार परिषदेत व्यक्त केलेली आहे.

Updated : 8 Sep 2020 9:40 AM GMT
Next Story
Share it
Top