Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > सरकारने परिस्थितीचे भान ठेवून "महाबीज"चे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे -दिपक पटेल

सरकारने परिस्थितीचे भान ठेवून "महाबीज"चे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे -दिपक पटेल

सरकारने परिस्थितीचे भान ठेवून महाबीजचे भांडार शेतकऱ्यांना मोफत खुले करावे -दिपक पटेल
X

शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

-------------------------------

त-हाडी, दि.३० ( सकाळ न्युज /महेंद्र खोंडे) :- मागील वर्षी परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले.यामुळे सोयाबीन बियाण्याचीही प्रत खालावली होती.याची झळ आता आगामी खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांना सोसावी लागत आहे.सोयाबीनचे बियाणे क्विंटल मागे 1 हजार रुपयांपेक्षा अधिक महागले आहे.प्रामुख्याने महाबीजच्या बियाण्याचा दर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट होत आहे. तरी सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा तात्काळ पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या धुळे जिल्हा अध्यक्ष दिपक पटेल यांनी केले आहे.

राज्यात सोयाबीन हे प्रमुख पीक झालेले आहे. राज्यात जवळपास 39 लाख हेक्टरपेक्षा अधिक सोयाबीन क्षेत्र आहे.यासाठी सोयाबीन उत्पादकांना लाखो क्विंटल बियाण्यांची गरज भासते.सोयाबीन हे स्वपरागसिंचित असल्याने दरवर्षी नवीन बियाणे विकत घेणे गरजेचे नसले तरी महाराष्ट्रात सोयाबीनचे 30 ते 40 टक्के दरम्यान नव्याने खरेदी होते.या बियाणे विक्रीत प्रामुख्याने महाबीजच्या वाटा असतो.

हंगामात सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना मोठी झळ सहन करावी लागली.असाच फटका बीजोत्पादनालाही बसला आहे.बियाणे कंपन्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.यामुळे सहाजिकच बियाणे उत्पादनात वाढ झाली.यामुळे बियाणे उत्पादक कंपन्यांनी आता दरवाढ केलीय आहे.महाबीज बियाण्याच्या 30 किलो वजनाची बॅग मागील वर्षी पेक्षा 360 रुपयांनी यंदा महागली आहे.मागील वर्षात 1,890 ला मिळणारी बॅग 2250 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

म्हणून किलोलो 75 रुपयांना दर चुकवावा लागणार आहे.तर काही खासगी बियाणे कंपनीचे दर प्रति बॅग 2,400 किंवा त्यापेक्षा अधिक झाले आहेत.ही शेतकऱ्यांची लूट आहे.या कोरोनाच्या अडचणीच्या काळात सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करणे अपेक्षित होते मात्र त्या उलट त्यांनी दरवाढ केली आहे.म्हणून सरकारने महाबीजचे भांडार शेतकऱ्यांसाठी मोफत खुले करावे किंवा शेतकऱ्यांना पॅकेजचे बियाणे उपलब्ध करून घ्यावे व खाजगी कंपन्यांच्या भाववाढीवर निर्बंध घालावे अशी मागणी दिपक पटेल यांनी केली आहे.

...........चौकट

सर्व बियाणे औषधे खतांची किंमत कमी कराव्यात...

खरीप हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकांची पेरणी करतात. पण सध्या सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाव कमी करण्याऐवजी भाववाढ केली आहे. यामध्ये यंदा ही किंमत 360 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. ही दरवाढ शेतकऱ्यांना परवडणारी नसून म्हणून शेतकऱ्यांचे नुकसान आहे. यासाठी ठाकरे सरकारने सोयाबीन नव्हे तर कापूस, बाजरी आदी खरीप हंगामातील सर्व पिकांच्या बियाणे औषधे खतांची किंमत कमी करून कोरोनात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने होत आहे.

Updated : 7 Jun 2020 12:12 PM GMT
Next Story
Share it
Top