Home > महाराष्ट्र राज्य > समुपदेशक टीम तर्फे सर्व समाज कार्यकर्ते प्राध्यापक वर्ग युवक-युवतींना विनंती

समुपदेशक टीम तर्फे सर्व समाज कार्यकर्ते प्राध्यापक वर्ग युवक-युवतींना विनंती

समुपदेशक टीम तर्फे सर्व समाज कार्यकर्ते प्राध्यापक वर्ग युवक-युवतींना विनंती
X

प्रतिनिधी/ उज्वल अशोकराव चौधरी

अलीकडच्या काळात आपण बऱ्याच प्रमाणात शालेय समुपदेशन विषयी वाचतोय पण त्यावर नक्की कृती कशा प्रकारे करता येईल किंवा शालेय समुपदेशन गरजेचे आहे पण त्याला शासनापर्यंत लवकरात पोहोचवणे लवकर शासनाने त्यावर लक्ष द्यावे अशा प्रकारचे विधान आपल्याला बरेच कमी लोकांच्या तोंडून ऐकावयास मिळते याची गरज जरी संपूर्ण मानव समाजाला असली तरी त्याची जाणीव फक्त काही लोकांनाच आहे असे आपण म्हणू शकतो त्यातीलच काही लोक म्हणजे समाजकार्यकर्ते समाज कार्यकर्त्या असे आपण म्हणू शकतो कारण समाज कार्य आणि समाजकार्य शिक्षण हे संघर्षमय वाटचाल आहे इथे प्रत्येक क्षेत्रात नवा संघर्ष अनुभूती प्रचिती व आनंद आहे आपण बघतो की किशोरवयीन आरोग्य जीवनशैली व समस्या ह्या रोजच्याच दिवसात आपल्याला वाढताना दिसतात चांगले काय वाईट काय प्रेम आकर्षण किंवा मित्र समजू की कोण अशा अनेक गोंधळात पडलेले युवक-युवती यांना समजून घेण्याकरिता शाळेमध्ये समुपदेशकाची भूमिका फार महत्त्वाची ठरते असे एक साधारणतः आपल्याला लक्षात येते ह्यालाच अनुसरून महाराष्ट्रातील काही समाजकार्य करणारे युवक-युवती यांनी मिळून एक अभियान सुरू केल्याचे आपणास दिसते की प्रत्येक शाळेत समुपदेशक म्हणून शिक्षित व प्रशिक्षित समाजकार्यकर्त्याची नेमणूक शासनाने करायलाच हवी या अभियानाला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतोय बऱ्याच लोकांनी त्यांची मते गुगल फॉर्म द्वारे समुपदेशक टीम दिलेली आहे याप्रमाणे बरेच युवक युवती समाज कार्यकर्ते पालक हा फॉर्म भरत आहे.

समुपदेशन टीमची जबाबदारीदेखील त्याच प्रमाणात वाढत आहेत समुपदेशन टीम सर्व महाराष्ट्रातील समाजकार्याच्या युवक-युवतींना आवाहन करते की ज्यांना कुणाला आमच्यासोबत जोडून कार्य करायचे आहे यांनी टीमशी संपर्क साधा कारण हे अभियान कुणा एकाचे वैयक्तिक नसून ते सामाजिक अभियान झाले आहे सर्व समाज कार्य युवक-युवती सहकार्य करतील ही आशा.

समुपदेशक टीम

यशोधन लांडगे 7843067345

सचिन डोळेसे. 9850522292

उज्वल चौधरी. 9970771919

Updated : 25 Aug 2020 9:05 AM GMT
Next Story
Share it
Top