समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारीत राज्यघटना हा देशाचा धर्म आहे...
X
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूतळा लोकार्पन सोहळ्यात प्रा. जोगेन्द्र कवाडे यांचे प्रतिपादन
कारंजा प्रतिनिधी दिलीप रोकडे
कारंजा : सारं जग कोरोना महामारीने त्रस्त असतांना बाबासाहेबांच्या अप्रतिम अशा पूर्णाकृती पूतळ्याचे स्वातंत्र्यदिनी लोकर्पण करून आपण सर्वांनी देशाला सलाम केला हे महत्त्वाचे आहे. असे सांगून पुढे म्हणाले की, या देशात अनेक धर्म आहे. हजारो जाती आहेत. दर 14-14 मैलावर भाषा बदलणार्या हजारो भाषा आहेत. मात्र या देशाचा धर्म-समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्यायावर आधारीत राज्यघटना हा देशाचा धर्म आहे. असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, जगप्रसिद्ध लाँगमार्च प्रणेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड) तहसील अंतर्गत येणार्या खेर्डा (बु.) येथे आयोजित परमपुज्य, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलतांनी केले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूतळ्याचा लोकार्पण सोहळा स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 1 वा. प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठनेतेमाजी आमदार मा. प्रकाशजी डहाके, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दलितमित्र गोपाळराव आटोटे, पक्षाचे प्रवक्ते तथा विदर्भाध्यक्ष चरणदासजी इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव डोंगरदिवे यांच्या अध्यक्षतेखाली, गावच्या सरपंच सिमाताई ढोके, कारंजा न. प. अध्यक्ष शेषराव ढोके, माजी नगराध्यक्ष नरेंद्रजी गोलेच्छा, वाशिम जि. प. शिक्षक संघटनेचे नेते विजयराव मनवर, पीआरपीचे जिल्हाध्यक्ष दौलत हिवराळे, जिल्हा महासचिव, सरकार इंगोले, जिल्हा संपर्क प्रमुख तथा तालुका अध्यक्ष विलास राऊत जिल्हानेते बाबाराव डोंगरदिवे, अॅड. अरूण खंडागळे पं. स. कारंजा माजी उपसभापती पप्पु खंडागळे, आनंदा ढोके, विजय गागरे, चाँदभाई मुन्नीवाले, अकोला जिल्हा नेते शेषराव अंभोरे, कैलास सरदार यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या नेत्रदिपक लोकार्पण सोहळ्याप्रसंगी, सर्वप्रथम पुज्य भन्ते महाथेरो-आनंदबोधी, भन्ते अश्वजित, भन्ते नागसेन, भन्ते शिलानंद, भन्ते धम्मदिप, आदी भिरखू संघाच्या वतीने बुद्धवंदना घेण्यात आल्यानंतर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा. प्रा. जोगेन्द्र कवाडे सर यांच्या हस्ते, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूतळ्यास आकर्षक असा पुष्पहार घालून अभिवादन पूतळ्याचे लोकार्पण करण्यात आले.
त्यानंतर या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करतांना प्रा. जोगेन्द्र कवाडे पुढे म्हणाले की, गरीब, श्रीमंताना जोडण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. जगातील सर्वोउत्कृष्ठ राज्यघटना दिली. ते या देशावर उपकार आहे. हे उपकार जोकोणी नाकारत असेल त्याला मी देशभक्तच समजत नाही. सुर्याची, चंद्राची, पावसाची. हेवची, उजेडाची जात सांगा मला, सांगा! त्याची जात माहीत नाही, मात्र देशात जातीचा बागुलबुवा निर्माण करणारे लोक देशाला तोडण्याचे काम करतात असे लोक देशभक्त होऊच शकत नाही, असे सांगून पुढे म्हणाले की, खरं पाहता हा लोकार्पण समारंभ मोठा व्हायला पाहीजे होता. परंतू कोरोणाचे संकट आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या हजारो अनुयायांची इच्छा असतांना सुद्धा त्यांना या समारंभाला बोलावणे व येणे शक्य झाले नाही. सरकारनी कोरोना बचावार्थ ज्या काही सुचना दिल्या त्याप्रमाणे त्या सुचनाचे पालन करून आपण वागले पाहीजे, कारण कायदा हा कोणी केला, बाबासाहेबांनी, त्याच कायद्यानुरूप सरकारनी नियम दिले. त्याचे आपण पालन करून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतो आहे.
याप्रसंगी माजी आमदार तथा कृ.उ.बा.स.चे सभापती प्रकाशजी डहाके यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की, आपण कोणत्या जातीचे, धर्माचे आहे ते बाजूला ठेवा, सर्वात पहिले आपण भारतीय आहोत. आणि शेवटपर्यंत भारतीयच असेल अशी जाणीव ठेवून सर्वांनी देशहितासाठी वाटचाल करावी. असे आवाहन केले व आयोजक मंडळी तथा गावकरी मंडळीचे कौतुक केले व पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी लवकरात लवकर संबंधित विभागात जि.प. निधीतून प्रस्ताव सादर करण्याचे जि. प. सदस्य अशोक डोंगरदिवे यांना सांगितले व पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाकरीता मी सर्वोतोपरी सहकार्य करेल असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाळराव आटोटे, विदर्भ प्रदेशाध्यक्ष चरणदासजी इंगोले, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
तर प्रास्ताविक सरपंच सिमाताई ढोके, यांनी केले असून सुत्रसंचालन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे खेर्डा शाखा प्रमुख विनायक वरघट यांनी तर आभार प्रदर्शन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख, तालुकाध्यक्ष विलास राऊत यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विनायक वरघट, खेर्डा ग्रा.पं. उपसरपंच शंभु म्हस्के, ग्रा. पं. सदस्य कुणाल नगराळे, सुनिल खंडारे, संजू इंगळे, महेंद्र आठवले, राहूल आठवले, आनंद डोंगरदिवे, दादाराव डोंगरदिवे, दिलीप आठवले, पंकज महल्ले, महिला मंडळाच्या अध्यक्षा योगीता नगराळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती खेर्डाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रा. पं. चे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य व समस्त गावकरी मंडळी यांनी विशेष परिश्रम घेतले.