Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी

सत्यवान -सावित्रीची आठवण करीत वट पौर्णिमा साजरी
X

जन्मो -जन्मी आहे तोच पती रहावा अशी प्रार्थना करीत भगवान शंकराचे प्रतीक असलेल्या वडाच्या फांदीला धागा बांधून सात फेरे मारून एक दुसऱ्याची ओटी भरून वडाच्या फांदीची पूजा

त-हाडी महेंद्र खोंडे -शुक्रवार(ता,5 )रोजी त-हाडी सुवासिनींनी वट पौर्णिमा उत्सव साजरा केला,कोरोना मुळे तोंडावर मास्क लावून,व शारीरिक अंतर सुद्धा पाळण्यात आले.

परिसरात बऱ्याच ठिकाणी खुल्या जागेत व काही मंदिरात वडाचे वृक्ष आहेत परंतु या ठिकाणी जाऊन पूजा करण्यास मनाई करण्यात आली होती,म्हणून सुवासिनींनी घरात,किंवा दारासमोर वडाच्या झाडाची फांदी मागवून पारंपरिक पद्धतीने पूजा करून, सावित्रीच्या व्रताचे पालन केले, वडाची फांदी आणून पूजा करण्यात आली यात प्रामुख्याने सौ,सोनलताई खोंडे ,सौ,सुनदाबाई वानखेडे सौ,सगिताबाई वानखेडे,, सरलाबाई भामरे यांनी पुढाकार घेऊन गल्लीततील महिलांना पूजेची संधी उपलब्ध करून दिली, त्यांना महेंद्र खोंडे,सामाजिक कार्यकर्ता गणेश भामरे यांनी सहकार्य केले,तसेच रत्नाबाई सोनवणे, वदनाबाई धनगर प्रतिभा भामरे प्रतिभा धनगर सरलाबाई भामरे अलकाबाई अहिरे ,हिराबाई अहिरे सोनल अहिरे यांनी ही सहकार्य केले,परिसरात विविध भागात सकाळपासून दोन-चार महिलांनी प्रशासनाचे नियम पाळत वट पौर्णिमा साजरी केली, या समयी कोरोना व्हायरस मुळे प्रथमच चेहऱ्यावर मास्क लावून वड वृक्ष पूजा करण्याची वेळ सुवासिनींनवर आली अशी प्रतिक्रिया साठ वर्ष वयाच्या श्रीमती शोभाबाई पाटील यांनी दिली,तर पासष्ट वर्ष वयाच्या श्रीमती लता बाई म्हणाल्या की यापूर्वी आम्ही फांदीची पूजा कधीच केली नाही.

Updated : 5 Jun 2020 11:44 AM GMT
Next Story
Share it
Top