Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > संपूर्ण राज्यात पक्षबांधणी करणार- आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे पालम शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत

संपूर्ण राज्यात पक्षबांधणी करणार- आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे पालम शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत

संपूर्ण राज्यात पक्षबांधणी करणार- आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे पालम शहरात ठिकठिकाणी जोरदार स्वागत
X

आरूणा शर्मा

पालम राष्ट्रीय समाज पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार पाडून पक्षाला राज्यभरात पोहोचविण्यासाठी अहोरात्र परिश्रम करून त्याचबरोबर सर्व स्तरांमधील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, आगामी सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती नूतन प्रदेशाध्यक्ष आमदार रत्नाकर गुट्टे यांनी दिली.

राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आले त्यांचा राष्ट्रीय समाज पक्ष रत्नकरराव गुट्टे मित्र मंडळ पालम व नागरिकांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यास रासपचे जिल्हा अध्यक्ष संदीप अळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णा सोळंके,पालमचे प्रभारी माधवराव गायकवाड, गंगाखेडचे प्रभारी हनुमंत मुंडे,सभापती मुंजाराम मुंडे, हनुमंत लटपट्टे यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना आमदार रत्नाकर गुट्टे म्हणाले की रा स प चा विचार महादेवराव जानकर यांची दूरदृष्टी राज्यभर पोहोचविण्यासाठी माझ्यावर पक्षाच्यावतीने ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाने आपणास दिलेल्या संधीचे आपण सोने करू,राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावा-गावांमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे शाखा व पदाधिकारी तयार करून पक्ष बांधणी करण्यात येणार आहे.हे आपले प्रथम कर्तव्य आहे तर कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी त्यांना सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी आगामी सर्वच निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वबळावर लढविण्यात येणार आहेत यातून तळागाळातील कार्यकर्तेही सत्तेत सहभागी होऊ शकतील असे ते म्हणाले. या सत्कार सोहळ्याला तालुका अध्यक्ष नारायण दुधाटे तालुका अध्यक्ष बाळासाहेब कुरे,साहेबराव सुरनर,गणेश घोरपडे,असदखा पठाण,शेख गौस,वसंतराव घोडके,बाबासाहेब एंगडे, विजय शिंदे, भगवान शिरस्कर गजानन भस्के,तायरखाँ पठाण, विनोद किरडे,गंगाधर डुकरे, विनायक पौळ,चंद्रकांत गायकवाड, सयद सुभाण, राहुल शिंदे ,अतुल धुळगंडे, मारोती शेगुंळे,शेख शौकत,शेख बशीर, विश्वजित स्वामी, सदाशिव शिंदे,माधवराव नळदुर्ग,यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते त्याचबरोबर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार रत्नाकर गुट्टे यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला.

Updated : 3 Nov 2020 6:53 PM GMT
Next Story
Share it
Top