Home > विदर्भ > श्री.संत शिरोमनी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

श्री.संत शिरोमनी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी

श्री.संत शिरोमनी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी
X

रितेश भोंगाडे/ राळेगाव :--- राळेगांव येथील सर्व नाभिक बांधवानी कोरोणाच्या महामारी मुळे व नियमाच्या बंधनात राहुन साध्या पध्दतीने समाजाचे आराध्य दैवत श्रीसंत शिरोमनी सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली.

समाजाचे मार्गदर्शक श्री.राजेद्रभाऊ नागतुरे व श्री.ससनकर सर यांनी प्रथम सेना महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन व पुजन करुन अभिवादन केले.

सदर छोटे खाणी कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव येथील गुरुदेव मेन्स पार्लर येथे करण्यात आहे होते.

कार्यक्रमास नाभिक समाज तालुका अध्यक्ष प्रविन वनस्कर,सचिव जीवन कडवे तसेच सदश्य सुधाकर खेडकर ,अनिल घारवडकर ,अमोल चौधरी,निलेश वाटकर,अभिजित ससनकर,मंगेश चौधरी,अमर वाटकर, कुणाल चौधरी,अमोल निबांळकर , प्रंशात कडवे,आकाश चिंचोळकर,बालाजी वनस्कर सह नाभिक समाज बांधव उपस्थित होते.

Updated : 17 Aug 2020 3:57 AM GMT
Next Story
Share it
Top