श्री संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था मुर्तीजापूर कडून कर्करोग रुग्णांला मदत
X
प्रतिनिधी :- भुषण महाजन दि. 26/10/2020
मुर्तिजापुर तालुक्यातील माटोडा येथील कु. कोमल नालंदा अवसरमोर हिला खेळण्याच्याच वयात कर्करोग या भयावह आजाराले ग्रासले आहे. कु. कोमल हिला मुर्तिजापुर विधानसभेचे आवडते आमदार हरीष पिंपळे यांनी तिला उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधी मधून मदत मिळवून दिली होती.
आज संतोष भांडे उपाध्यक्ष श्री. संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्था, मुर्तिजापुर यांच्या वाढदिवसा निमित्त 5000 रुपयांचा धनादेश कु. कोमल हिची आई सौ.मंजु नालंदा अवसरमोर यांना आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते देण्यात आला. संतोष भांडे यांनी आपला वाढदिवस असा वेगळया रित्याने साजरा केला. यावेळी भुषण कोकाटे (भाजपा तालुकाध्यक्ष मुर्तिजापूर), सुनिल लशुवानी - सचिव सं.ग.म. बहुद्देशीय संस्था, भुपेंद्र पिपंळे, संदिप जळमकर, गजानन ढोरे, बद्री दुबे, योगेश फुरसुले-सदस्य-स.ग.म.संस्था, सुधीर दुबे, गणेश ठाकरे, न्यानु महामुने आदि उपस्थित होते.
प्रतिनिधी – भुषण महाजन मो. 9850024474 / 9156273113