- वणी नार्थ एरीया के कोलार पीपरी खनदान में होराह है भ्रष्टचार
- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..

शैक्षणिक समुपदेशनासाठी समाजकार्याच्याच विद्यार्थ्यांची आवश्यकता का?
X
लेखक/वार्ताहर
उज्वल अशोकराव चौधरी
आपल्याला लक्षात येते की शाळा समग्र एक विकासाच्या संधी देणारे संघटित केंद्र आहे समाज घडवण्याच्या करिता शाळेचे महत्त्वाचे योगदान आहे मुलांच्या मनावर सतत येणारा ताण परीक्षा आणि अभ्यासक्रमाची ओझे माध्यमांची अग्रक्रम आणि आता ऑनलाईन शिक्षणामुळे गोंधळलेली अवस्था आपल्याला बालकांची आणि तरुणांचे नैसर्गिक व सहज जिज्ञासू प्रक्रिया ही पद्धती मारक ठरत असताना आपल्याला दिसत आहे म्हणूनच का दिवसेंदिवस मानसिक विकृती दिवंगत होतांना आपल्याला लक्षात घेत आहे समुपदेशकपद प्रत्येक शाळेत खरंतर अनिवार्य असलं पाहिजे, तरच मुलांच्या समस्या सुटू शकतात. 'युनिसेफ'ने २००२मध्ये समावेशित शिक्षणाचा आग्रह धरला. त्यानंतर भारतामध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत विशेष गरजा असलेल्या बालकांसाठी फिरते विशेष शिक्षक आले. अशाच प्रकारे प्रत्येक शाळेत, विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात समुपदेशक शासनाद्वारे पुरवले गेले पाहिजेत किंवा विद्यमान शिक्षकांपैकी काही शिक्षकांना समुपदेशक कौशल्य आत्मसात होतील, अशा प्रकारचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी पाठवले गेले पाहिजे.
सध्याच्या स्थितीमध्ये समुपदेशक ज्या शाळांमध्ये अस्तित्वात आहेत ते अत्यंत तंत्रशुद्ध शास्त्रीय पद्धतीने, समस्याप्रवण विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना आढळतात. ते स्वतः विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या मुलाखती घेऊन, त्या मुलाची समस्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, याचा विचार करून शिक्षकांना, पालकांना, संस्थेला मार्गदर्शन करीत असतात. जर शिक्षक संपूर्णपणे समुपदेशकाचे शिवधनुष्य पेलणारा असेल, तर हे सर्व करत असताना शिक्षक स्वतःच्या अध्यापनाकडे किती लक्ष देईल, याबाबत शंका उपस्थित होते. प्रत्येक शाळेमध्ये समुपदेशक असणं हे अनिवार्य आहे, नव्हे ती काळाची गरज आहे. समुपदेशकाच्या मदतीशिवाय अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सजग होणार नाही. विद्यार्थ्याचं अनुभवविश्व, त्याच्या मेंदूची रचना, या सगळ्यांचा विचार करीत अध्यापनपद्धती ठरवता येते. बालकाला जर काही समस्या असेल, तर नक्की आपण काय करायचं, या विवंचनेत शिक्षक अडकलेला असतो. अशा वेळी शाळेत असलेला समुपदेशक त्याला मदत करतो.
समाजकार्य पदूत्तर विषयातील विद्यार्थी या दृष्टीने योग्य समुपदेशन करू शकतात कारण त्यांना अभ्यासक्रम हा आंतरविद्या स्वरूपाचा असल्याने व क्षेत्रीय अभ्यास अधिक असल्याने त्यांची गुणवत्ता समस्या सोडविण्याच्या दृष्टीने अधिक प्रगल्भ म्हणून समाजकार्याच्या परांगत एम एस डब्ल्यू विद्यार्थी अधिक लायक व योग्य आहेत.