Home > विदर्भ > शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या खाजगी शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी गौरव मोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं

शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या खाजगी शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी गौरव मोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं

शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या खाजगी शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी गौरव मोरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनं
X

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी (भुषण महाजन) :- कारोनो विषाणूने संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत अनेक शिक्षण संस्था आपले तोंड उघडे करून शुल्काकरिता पालकांना त्रास देत आहेत. यंदा शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या खाजगी शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी जिल्हाधिकारी कडे केली आहे. संपूर्ण जगात कोरोना महामारी मुळे मोठे संकट आले आहे.या संकटामुळे बेरोजगारीचा प्रश्न प्रथम क्रमांक वर वाढलेला आहे. शासन सुद्धा या परिस्थितीपुढे हतबल झाले आहे. त्यातच हे खाजगी शिक्षण संस्था चालक आपल्या मनमानीने पालकांना फि करिता मानसिक त्रास देण्याचे काम करत आहे. शाळेचे व्यवस्थापन वारंवार पालकांना शाळेची फी भरण्यासाठी फोन लावत आहे खाजगी शाळांना शैक्षणिक शुल्क आकारू नये असे शासनाचे आदेश असताना सुद्धा शाळेचे व्यवस्थापक यांच्या दबावाखाली येऊन शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षिका विद्यार्थ्यांना फी मागत आहे. सध्या ऑनलाईन चा प्रश्न समोर आल्याने या खाजगी शाळांच्या मार्फत अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास करिता जोडण्यात आले नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांना संस्थाचालकांच्या मनमानी मुळे उशिराने ऑनलाईन अभ्यास करिता जोडण्यात आले. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले. अशा खाजगी शाळांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच शाळांनी पुन्हा पालकांना त्रास देऊन फी मागितली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाळेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुकाध्यक्ष गौरव मोरे यांनी दिला आहे.

भुषण महाजन मो.नं. – 9850024474 / 9156273113

Updated : 8 Sep 2020 11:07 AM GMT
Next Story
Share it
Top