Home > विदर्भ > शेतात आढळलेल्या अजगराला दिले जिवनदान

शेतात आढळलेल्या अजगराला दिले जिवनदान

शेतात आढळलेल्या अजगराला दिले जिवनदान
X

यवतमाळ- येथील नागपुर रोड स्थित काळे यांच्या शेतातील गाय म्हशीच्या गोठयात एक मोठा अजगर प्रजातीचा साप आढळून आला. काळे यांनी लगेच वाईल्डलाईफ कंजर्वेशन रिसर्च संस्थेचे सर्पमित्र अजय वर्मा यांच्याशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली. यानंतर सर्पमित्र अजय वर्मा, पवन दळवी यांनी पोहचुन अजगर सापाला शिताफिने पकडून सुरक्षित जेरबंद केले. वनविभाग यवतमाळ यांना माहिती देवून प्राथमिक वैद्यकीय परीक्षण केले. वनविभाग अधिकारींच्या उपस्थितित जंगलात या अजगराला सोडण्यात आले. संस्थेचे निखिल राउत यांनी आवाहन केले आहे की सध्या साप निघण्याचे प्रमाण वाढले आहे, कुठेही साप व वन्यजीव आढल्यास संस्थेचा हेल्पलाइन नंबर 9960403734 यावर संपर्क साधावा.

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/08/VID-20200802-WA0029.mp4"][/video]

Updated : 3 Aug 2020 4:41 AM GMT
Next Story
Share it
Top