शेतकऱ्याने आपला आजारी बैलाच मृत्यू झाल्याने त्याच्या प्रेमाखातर तेरविचा कार्यक्रम साजरा
X
शेतकऱ्याने आपला आजारी बैलाच मृत्यू झाल्याने त्याच्या प्रेमाखातर तेरविचा कार्यक्रम साजरा
संपूर्ण गावातील नागरिकांना तेरवीच्या भोजनाचा आमत्रंम. .
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम
यवतमाळ / झरि जामणी :- शेती ,शेतकरी आणि वृषभ राजा (बैल)...आपल्या कृषी व्यवस्थेचा ..अर्थव्यवस्थेचा कणा आहे.सगळ्या जगण्याचा कणा .शेतकरी ही अशी व्यक्ती आहे की, त्याचे आपल्या मुलाबाळांवर,आपल्या कुटुंबावर प्रेम असते तेवळेच, प्रेम शेतीसाठी राबणाऱ्या आपल्या वृषभ (बैल) राजावर म्हणजे आपल्या बैलावर असते .शेतकरी आणि बैल याचे अतूट आणि भावनिक नाते असते .याचाच प्रत्यय आला यवतमाळ जिल्ह्यातील अति दुर्गम भागातील मुकुटबन गावात .कैलास राऊत यांच्याकडे गेल्या १५ वर्षांपासून एक बैल होता. आजारपणामुळे या बैलाचा मृत्यू झाला त्यामुळे आपल्या कुटुंबाला घराचा सदस्य गेल्या सारखे दुःख झाले . या कुटुंबाने घराचा सदस्य गेल्यासारखे या वृषभ राजाचे तेराविचा विधी पार पाडले .विधिवत लोकांना जेवणपण दिले , यामुळे बळीराजा आणि वृषभराजाचे किती भावनिक संबंध असतात हे सिद्ध होते. तालुक्यात स्वतःच्या बैलावर असलेलं मुक्या जनावरांवर असलेलं अतूट प्रेम हा चर्चेचा विषय तालुक्यात बनलेला आहे.
प्रतिनिधी :- पुरुषोत्तम गेडाम
मो.9763808163