शेतकऱ्यांना हेक्टरी ५०हजार रुपये मदत करून तत्काळ पिक विमा मंजुर करा
X
म मराठी न्यूज नेटवर्क
विशेष प्रतिनिधी अमोल सांगानी
राळेगाव यवतमाळ 9860276226
राळेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50 हजार रु मदत द्यावी व पीकविमा मजुर करावा इत्यादी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणी असंख्य शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे साहेब यांना तहसीलदार साहेब राळेगाव यांच्या मार्फत शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईकरिता मनसे तालुकाअध्यक्ष शंकर वरघट याच्या नेतृत्वात निवेदन सादर केले आहे पुढे संसार चालवायचा कसा.मुला बाळाच्या शिक्षनाचा खर्च करायचा कोठुण.शेतीसाठी कर्ज काढुन केलेला खर्च आणी ते कर्ज भरायचे कुठुन असे एका ना अनेक समस्यांचा डोंगर शेतकऱ्यांनापुढे उभा आहे अतिवृष्टीमुळे आणी कपाशीवर आलेल्या बोंडअळी या रोगामुळे शेतकऱ्यांचा शेतीत झालेला खर्च सुध्दा निगेनासा झाला आहे पहिलेच बोगस बियाण्यांमुळे दुबार तिबार पेरण्या झाल्या आणी आता आलेल्या अतिवृष्टी आणी बोंडअळीमुळे शेतकरी पार मेटाकुटीला आला आहे त्यामुळे शेतकरी निराशेच्या गर्तेत सापडला असुन देशोधडीला लागला आहे म्हणुन शेतकऱ्यांना निराशेच्या गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाव तालुक्याच्या वतीने काही मागण्या केल्या असे मनसे तालुकाध्यक्ष शंकर वरघट यांनी सांगितले आहेत निवेदनात संपुर्ण रालेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा
कापुस.सोयाबीनच्या पिकांच्या नुकसानी साठी हेक्टरी 50 हजार रु नुकसानभरपाई द्यावी
पिकविमा कंपन्यानी कुठल्याही अटी न लादता प्रशासनाच्या सर्वेक्षनाचा आधारे पिकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावा
कापुस.सोयाबीनची हमीभावा पेक्षा कमी भावाने खरेदी करुन शेतकऱ्यांना लुबाडनाया व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी
cci ची कापुस खरेदी केंद्रे सुरु करावी
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना चणा.गहु अनुदानावर उपलब्ध करून द्यावा
याप्रकारच्या शेतकरी बांधवांसाठी मागण्या करण्यात आल्या आहे येत्या आठ दिवसात आमच्या मागण्यांची सरकार आणी प्रशासनाने योग्य दखल घेऊन शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अन्यथा महाराष्ट्रात नवनिर्माण मनसे राज्यउपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांच्या नेतृत्वाखालील रालेगाव तालुक्यात मनसे शेतकऱ्यांनासाठी रस्त्यावर उतरून जनआंदोलन छेडेल असा इशारा शंकर वरघट आणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणी शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे निवेदन देतेवेळी मनसे तालुका अध्यक्ष शंकर वरघट गणेश काकडे राहुल गोबाडे नरेंद्र खापणे ऋषिकेश मिर्झापुरे आरिफ शेख जगदीश गोबाडे सुमित काकडे प्रदीप पानघाटे प्रकाश घोटेकार सुनील सुनील कोडापे प्रमोद प्रमोद शेडमाके उमेश पेंदोर ,मंगेश मोहूर्ले, कार्तिक महाजन, बालकृष्ण चीचुलकर, देवा मेश्राम, प्रफुल वाढई, किशोर कलस्कर,किशोर कोटनाके, हर्षल चौधरी विठ्ठल जोगी संदीप गुरनुले गणेश मांदाडे वैभव वेट्टी रतन मांगुर्ले हर्षल आडे सुशील करपते मयूर शिंदे कुंदन आत्रम ओंकार आडे गजानन सोयाम विनोद टोंगे उमेश ठाकरे शेखर कवडे महेंद्र फुटाणे असंख्य महाराष्ट्र सैनिक आणि शेतकरी उपस्थित होते