Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाविकास आघाडी सरकारने केले १० हजार कोटीचे पँकेज जाहीर

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाविकास आघाडी सरकारने केले १० हजार कोटीचे पँकेज जाहीर

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाविकास आघाडी सरकारने केले १० हजार कोटीचे पँकेज जाहीर
X

"शेतकऱ्यांना मोठा दिलासा; महाविकास आघाडी सरकारने केले १० हजार कोटीचे पँकेज जाहीर"

म मराठी न्युज टिम

प्रतिनिधी विठ्ठल खाडे

मुंबई : पूर आणि अतिवृष्टी बाधितांना १० हजार कोटीचे पँकेज महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले. अतिवृष्टीचं संकट आलेलं आहे. एकूणच भयानक नुकसान झाले आहे. पिकं वाहून गेली आहेत, जमीन खरडून गेली आहे, रस्त्यांची विल्हेवाट लागली आहे, विहिरी गाळाने भरून गेल्या आहेत, विजेचे खांब उलटे पालटे झाले आहेत. सगळ्यांचा विचार केल्यानंतर सरकारनेे ही मदत जाहीर केल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पँकेज जाहीर केले आहे. सरकारने जाहीर केलेले १० हजार कोटी रुपये हे शेतीचे झालेले नुकसान, वाहून गेलेली शेती, खरडून गेलेली शेती, पिकं वाहून गेली असतील, रस्ते उध्वस्त झाले असतील, विजेचे खांब पडले असतील, दळणवळण यंत्रणा असेल, या सर्व गोष्टींसाठी असणार आहेत.

जिरायत, बागायत जमिनीसाठी रुपये ६,८०० प्रति हेक्टर ही केंद्र सरकारची मदत अपुरी असल्याचे राज्य सरकारने म्हटले असून म्हणून दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ₹ १०,००० देणार असल्याचे म्हटले आहे.

फळपिकांसाठी १८,००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५,००० रुपये प्रति हेक्टर (२ हेक्टरच्या मर्यादेत) मदत केली जाणार आहे. मृत व्यक्तींच्या वारसांना, मयत पशुधनासाठी, घरपडझडीसाठी वाढीव मदत देण्यात येणार आहे.

Updated : 24 Oct 2020 4:31 PM GMT
Next Story
Share it
Top