Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करून पंचवीस हजार हेक्टरी मदत द्या....आ.भीमराव केराम

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करून पंचवीस हजार हेक्टरी मदत द्या....आ.भीमराव केराम

शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीची पाहणी करून पंचवीस हजार हेक्टरी मदत द्या....आ.भीमराव केराम
X

सोयाबीन,कापूस,मूग,उडीद पिकांचे प्रचंड नुकसान...

श्री क्षेत्र माहूर/ता.प्र.पदमा गिर्हे

मागील आठवड्यात किनवट माहूर तालुक्यातील सतत दहा ते बारा दिवस पावसाने झड लावली होती.यामुळे हातातोंडाशी आलेले मूग उडीद पिके उद्ध्वस्त झाले तर सोयाबीन पिवळे पडून तर कापसाला ‘मर’रोग लागल्याने झाडे जाग्यावर कोमेजून मरत आहेत.अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्याची मागणी आ.भीमराव केराम यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे. त्या पत्राची एक प्रत कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे यांनीदेखील पाठवण्यात आलेली आहे.

माहूर किनवट शेतकरी नेहमीच आसमानी व सुलतानी संकटाचा बळी ठरत असतो कधी आवर्षण तर कधी अतिवृष्टी अशा संकटाचा सामना करत असताना उरलीसुरली कसर खाजगी व्यापारी पूर्ण करतात अशा अवस्थेत नेहमी जगाचा पोशिंदा शेतकरी भरडला जातो. सध्या ही परिस्थिती काही वेगळे नाही. अनुकूल वातावरणामुळे खरीप पिके डोलत असताना मागील आठवड्यात सतत दहा ते बारा दिवस संततधार पाऊस पडल्याने हातातोंडाशी आलेले मूग,उडीद पिके उध्वस्त झाली तर सोयाबीन पिवळे पडले आहेत.कापसाची पिक अधिक प्रमाणात पाणी झाल्याने ‘मर’ रोगाचे शिकार बनून जागेवरच कोमजुन मरत आहे. आधीच कोरोना महामारी च्या संसर्गामुळे आणि लॉक डाऊन मुळे शेतकरी पुरते अडचणीत आले होते. त्या परिस्थितीतून सावरत नाही तर सततच्या पावसामुळे पिकाची मोठी हानी झाल्याने किनवट माहूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या स्तरावरून प्रत्यक्ष पाहणीचे आदेश देऊन हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्याची मागणी किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.या निवेदनाची प्रत कृषी मंत्री ना.दादाजी भुसे यांना देखील पाठवण्यात आल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

Updated : 8 Sep 2020 11:03 AM GMT
Next Story
Share it
Top