शेतकरी संघटनेचे कृषी विधेयक चर्चासत्र
"शेतकरी संघटनेचेकृषी विधेयक चर्चासत्रभ
म मराठी न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी/संजय कारवटकर
यवतमाळ/राळेगाव :- नूकतेच केंद्र सरकारने पारीत केलेल्या तिनं कृषी विधेयकाच्या विरोधात पंजाब मध्ये काही पक्ष, संघटनांनी आंदोलने केली व महाराष्ट्रामध्येही काही संघटना,पक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी ऊलट -सूलट चर्चा करून शेतकऱ्यांन मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करीत आहे.
नेमके हे तीन विधेयक १) शेतमाल व्यापार व्यवसाय,२) करार शेती विधेयक,३)जिवनाश्यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळण्यात आला.
हे तिनही विधेयक शेतकऱ्यांच्या कसे फायद्याचे आहे त्याचा शेती व्यवसायावर कसा चांगला परिणाम घडून येणार आहे या संबंधी चर्चा करण्या करिता चर्चा संत्र्याचे आयोजन दी.२८ अॉक्टोबंरला २०२०दु.१२ते ३ या वेळात बोरी(ई)ता. राळेगाव येथे करण्यात आले. असून या चर्चासत्रात प्रमूख मार्गदर्शक मधूसूधन हरणे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट तथा राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना, विजय निवल राज्य कार्यकारिणी सदस्य शेतकरी संघटना,जयंत बापट मार्गदर्शन करणार आहे.
तरी शेतकऱ्यांनी भविष्यात आपली शेती कशी राहील आणि बाजारपेठ या संदर्भात आपल्या शेती व्यवसायावर काय चांगला परिणाम घडून येईल हे जाणून घेण्याकरिता व शंका -समाधान होण्याच्या दृष्टीने राळेगाव तालुक्यातील शेतकरयांनी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अध्यक्ष राजेंद्र झोटींग, इदरचंद बैद,अक्षय महाजन, गोपाल भोयर, नरेंद्र ठाकरे,कीशोर राजूरकर,पवन गमे,नारायण बोरकर,सूमीत गमे,धर्मेश कुत्तरमारे ईत्यादीने केले..