Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शेख अब्दुल रहीम शिक्षक दिनानिमित्त तिहेरी पुरस्काराने सन्मानित!

शेख अब्दुल रहीम शिक्षक दिनानिमित्त तिहेरी पुरस्काराने सन्मानित!

शेख अब्दुल रहीम शिक्षक दिनानिमित्त तिहेरी पुरस्काराने सन्मानित!
X

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील नामवंत सामाजिक संस्था हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक तथा शिक्षक शेख अब्दुल रहीम सर हे शिक्षक दिनानिमित्त तिहेरी पुरस्काराने सन्मानित झाले. शैक्षणिक व सामाजिक उल्लेखनीय व भरीव योगदान दिल्याबद्दल शेख अब्दूल रहीम सर हे शिक्षक दिनानिमित्त तिहेरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर युथ फाउंडेशन सोलापूर तर्फे राष्ट्रीय शिक्षकरत्न पुरस्कार ,महाराष्ट्र आदर्श शिक्षक समिती तर्फे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार तसेच एक्का फाऊंडेशन संचलित मराठीमाती प्रतिष्ठाण तर्फे अभिमान पत्र प्रदान करण्यात आले.शेख अब्दुल रहीम सर यांना आज पर्यंत अनेक राष्ट्रीय, राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहे. शेख अब्दुल रहीम यांना शिक्षक दिनानिमित्त तिहेरी पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या चाहत्यांतर्फे व राज्यमंत्री अब्दुल सत्तार साहेब, शिक्षक आमदार विक्रम काळे साहेब, पदवीधर आमदार सतीश चव्हाण साहेब,मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे युनूस पटेल सर ,शिक्षक भारती चे प्रकाश दाणे,संतोष ताठे ,शगुफ्ता फारुकी मुप्टा चे प्रा.सुनील मगरे शिक्षक समिती चे दिलीप ढाकणे तसेच आईवडील मित्र परिवारातर्फे अभिनंदन होत आहे.

Updated : 9 Sep 2020 12:53 PM GMT
Next Story
Share it
Top