शिवाजी चौक येथे नव्याने सुरु होत असलेल्या दारु बारला परिसरातील नागरीकांचा प्रचंड विरोध
X
कज्जुम कुरेशी ता. घाटंजी जिल्हा यवतमाळ
8308969995
घाटंजी (प्रतिनिधी) शहरातील शिवाजी चौक येथील श्री समर्थ विद्यालय लगत नवीन दारु बार सुरु होत आहे त्यास परिसरातील नागरीकांचा विरोध वाढत जात आहे या संदर्भात परीसरातील नागरीकांनी जिल्हाआधीकारी यांना निवेदन देऊ हे बार नियमबाह्य असल्याने बंद करुन नव्याने परवाणग्या तपासावे अशी विनंती केली आहे शिवाजी चौकातील भौगोलिक स्थिती बघता ज्या ठिकाणी बार सुरु होत आहे त्या बाजुलाच प्राचीन आई मातेचे मंदिर वा श्री समर्थ महाविद्यालय आहे अश्या ठिकाणी बार सुरु झाल्याने परिसरातील शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही .
हा नवीन बार तात्काळ बंद करावा अन्यथा परिसरातील सर्व नागरिक एकञीत येऊन नाईलाजास्तव तिव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला व असे झाल्यास यास प्रशासन जबाबदार राहणार असे ५०० स्वाक्षरी च्या निवेदनाद्वारे जिल्हाधीकार्यांना कळविण्यात आले सदर निवेदन देतांना भाजपा शहर सरचिटणीस मनोज हामंद ,न.प.माजी उपाध्यक्ष अकबर तव्वर,नगरसेवक विजय रामटेके,अविनाश जळके,अमोल दिडशे उपस्थीत होते.