Home > विदर्भ > शिवाजी चौक ते कारंजा टी पॉइंट पर्यंत एलईडी लाईट लावण्याची मागणी

शिवाजी चौक ते कारंजा टी पॉइंट पर्यंत एलईडी लाईट लावण्याची मागणी

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन 9850024474

मूर्तीजापुर शहरातील शिवाजी चौक ते कारंजा टी पॉइंट पर्यंत एलईडी लाईट लावण्याची मागणी आरोग्य सभापती धनश्री बबलु भेलोंडे पालकमंत्री कडे निवेदनाद्वारे केली आहे. मूर्तीजापूर शहरातील शिवाजी चौक ते कारंजा टी पॉइंट पर्यंत या मार्गावर असलेल्या इलेक्ट्रॉनिक पोल वर लाईट आहे परंतु त्याचा प्रकाश अल्पशा प्रमाणात पडत असल्याने अनेक अपघात सुद्धा घडू शकतात म्हणून यासंदर्भात आपण काळजी घेऊन नागरिकांच्या सुरक्षा करिता शिवाजी चौक ते कारंजा टी पॉइंट पर्यंत नवीन एलईडी 50 ते 70 वॅटचे लाईट याठिकाणी लावण्यात यावे अशी मागणी नगरसेविका धनश्री बबलू भेलोडे यांनी केली आहे याची प्रतिलीपी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर. आमदार हरिष पिंपळे, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहीते यांना देण्यात आली आहे.

मुर्तिजापुर तालुका प्रतिनिधी / अकोला :- भुषण महाजन

Updated : 20 Nov 2020 7:25 PM GMT
Next Story
Share it
Top