- सहकार पॅनलचे राजुदास जाधव यांनी एकवीस वर्ष उपभोगली सत्ता यंदा मात्र मतदारांनी दिला रट्टा
- राजलक्ष्मी मल्टीस्टेट पतसंस्थेने केला कर्मचाऱ्यावर अन्याय
- उमरची सुटका कराः नॉम चॉम्स्की, राजमोहन गांधींची मागणी
- गृह विलगीकरणातील रुग्णांवर विशेष लक्ष ठेवा – जिल्हाधिकारी अजय गुल्हाने आता जिल्ह्यात घरोघरी लसीकरण मोहीम
- स्वप्नांना कष्ठाचे बळ द्या. - माजी नगरसेवक संजय कंचर्लावार भानापेठ प्रभाग क्र. ११ येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप सोहळा संपन्न.
- उन्हाळी हंगामातील धान खरेदीचे उदि्दष्ट वाढविण्याचा राज्य शासनाचा निर्णय. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराचे फलीत. १५ जुलै पर्यंत धान खरेदी करण्याचे अभिकर्ता संस्थांना शासनाचे निर्देश.
- संभाव्य कोरोना लाटेचा धोका टाळण्यास करा लसीकरण - आयुक्त राजेश मोहिते १२ ते १७ वयोगटासाठी शाळांमध्ये केले जाणार लसीकरण
- शहरातील सायकल ट्रॅकच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशीच्या मागणीसाठी भाई अमन यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
- आपले घर डेंग्युमुक्त ठेवा आताच काळजी घेतली तर धोका टळेल मनपा प्रा.आरोग्य केंद्रात मिळणार गप्पी मासे
- राष्ट्रीय रँकिंग धनुर्विद्या स्पर्धेत मंजिरी अलोने ला सुवर्णपदक

शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा दादा खराटे यांचा वाढदिवस महारक्तदानाने साजरा !
X
श्रीक्षेञ माहुर/ता.प्र.पदमा गि-हे
शिवसेनेचे नांदेड जिल्हा उपप्रमुख तथा नांदेड ज्योतिबा खराटे यांचा 55 वा वाढदिवस अंजनखेड येथे शिवसैनिक-युवासैनिक व चाहत्यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध क्षेञातील मान्यवरांनी व चाहत्यांनी भेटवस्तु न देता 121 पिशव्या रक्तदान करुन भावी कार्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यातच हाकेच्या अंतरावर असलेल्या मौजे गोंडवडसा येथील कट्टर सर्मर्थक बहुसंख् मुस्लिम बांधव व या सर्व चाहत्यांनी तसेच माहूर शिवसेना-युवासेना यांनी तब्बल 11 किलो वजनी असलेली सुंदर असा पुष्पमाला ज्योतिबादादा खराटे व त्यांच्या मातोश्री लिलाबाई खराटे यांच्यासह त्याच्या सौभाग्यवती मा.जि.प सदस्या सौ. विमलताई खराटे, पुत्र जय खराटे, सौ.वैशाली जय खराटे, यश खराटे, शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव, सौ.आशा जाधव आदींच्या गळ्यात घालीत त्यांना शुभेच्छा दिल्या...
दरम्यान वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना उत्तम स्वास्थ्य लाभ व उद्दंड आयुष्य लाभावे म्हणून युवासेनेच्या वतीने श्री रेणुका मातेच्या भव्य प्रतिमेला सामाजिक अंतर ठेवत महाआरती करण्यात आली. तर यानिमित्ताने घेण्यात आलेल्या भव्य महारक्तदान शिबीरात रक्त दान करण्यासाठी रक्तदात्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने या सोहळ्याची अधीकच रंगत वाढली...
यावेळी रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान केले असुन दुपारी चार वाजेपर्यंत एकूण 121 जणांनी रक्तदान केले असल्याचे रजिष्टर नोंदवरुन कळाले आहे....
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अनेक शिवसैनिकांसह अनेक बड्या नेत्यांनी तसेच मान्यवरांनी दुरध्वनीच्या व सोशलमिडीयाच्या माध्यमातून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेनेचे माहूर पं.स.चे उपसभापती उमेश जाधव, पंसंसदस्य नामदेवराव कातले, शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन ऩाईक, भाजपचे नेते अॅड.रमन जायेभाये, किनवटचे बालाजी मुरकुटे, गजानन कोल्हे पाटिल, मारोती दिवसे पाटिल, सुनिल पाटिल, कपील रेड्डे,बजरंग वाडगुरे, सिंदखेड पोलिस ठाण्याचे स.पो.नि मल्हार शिवरकर,नगरसेवक राजकुमार भोपी, रहेमत अली, नाना लाड, दिपक कांबळे, राजाराम गंधेवाड, सुधाताई कपाटे, आशाताई जाधव, मिना कोवे, सौ.पदमा गि-हे,जितु चोले, किसन राठोड, विश्वनाथ कदम, सुनील बेहेरे पाटील, अंबादास राजुरकर, अनिल रुणवाल, यांच्यासह अनेक राजकिय व शासकिय तसेच हजारो शिवसैनिकांनी अंजनखेड येथे वाढदिवसानिमित्ताने हजेरी लावून ज्योतिबा खराटे यांना शुभेच्छा दिल्या.
महारक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी नितीन पाटिल, अनिल रुणवाल, अंबादास राजुरकर, निरधारी जाधव, आकाश सातव,जयंत गि-हे, रुपेश कोवे, विकास कपाटे, दिपक कांबळे व शिवसैनिक-युवासेनिक आणि वसंतराव नाईक शासकीय रक्त पेढी यवतमाळ यांनी विशेस परीश्रम घेतले हे विशेष.