Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शिवसेना वर्धा जिल्हातील सर्व पदाधिकारी तथा शिवसैनिक आणि शेतकरी बाधंवाशी “विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार

शिवसेना वर्धा जिल्हातील सर्व पदाधिकारी तथा शिवसैनिक आणि शेतकरी बाधंवाशी “विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार

शिवसेना वर्धा जिल्हातील सर्व पदाधिकारी तथा शिवसैनिक आणि शेतकरी बाधंवाशी “विकेल ते पिकेल” या धोरणावर मा. मुख्यमंत्री शेतकऱ्यांशी संवाद साधणार
X

म मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र राज्य :- मा. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब विविध कृषि विषयक योजनांच्या संदर्भात दिनांक 10 सप्टेंबर 2020 रोजी दु. 12 ते 1.30 वा. शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या प्रसंगी मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कृषि मंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, कृषि सचिव एकनाथ डवले, पोकराचे प्रकल्प संचालक रस्तोगी, कृषि आयुक्त धीरज कुमार उपस्थित राहणार आहेत. राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, महिला व नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती कृषि मंत्री, दादाजी भुसे यांनी केली आहे.

कृषि, महसूल व ग्रामविकास विभागाचे क्षेत्रिय कर्मचारी ग्रामपातळीवर स्थानिकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेत. सदर कार्यक्रमाचे कृषि विभागाच्या यु-ट्युब चॅनेल

(http://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM) वर लाईव्ह प्रसारण या संकेतस्थळावर करण्यात येईल.

“विकेल ते पिकेल” अंतर्गत मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिर्वतन अभियानाची (SMART) सुरुवात करण्यात येईल. या प्रसंगी मा. मुख्यमंत्री ग्रामपातळीवरील कृषि विकास कार्यक्रमाची रुपरेषा मांडून “चिंतामुक्त” शेतकरी व “शेतकरी केंद्रित” कृषि विकास यावर आपले विचार मांडतील व शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

Updated : 9 Sep 2020 8:15 PM GMT
Next Story
Share it
Top