Home > विदर्भ > शिवराज मिञ मंडळाकडुन दिव्यांग आणी वृध्दांना कपडे वाटप

शिवराज मिञ मंडळाकडुन दिव्यांग आणी वृध्दांना कपडे वाटप

शिवराज मिञ मंडळाकडुन दिव्यांग आणी वृध्दांना कपडे वाटप
X

कोरोनाविषयी जनजागृती करत प्रेरणादायी ऊपक्रम

वाशिम-(फुलचंद भगत)कोरोनाच्या पार्श्वभुमीवर यावर्षी गणपती न बसवता कोरोनिविषयी जगजागृती करुन तालुक्यातील वृध्द आणी दिव्यांगांना कपडे वाटप करुन सर्वांसमोर एक नवा आदर्श येथील शिवराज मिञमंडळाचे अनिल गावंडे यांनी निर्माण केला आहे.

सदैव सामाजिक कार्याचा वसा घेतलेले सतत पंचविस वर्षापासुन भरगोस मतांनी निवडुन भाजपाचे नगरसेवक अनिल गावंडे तथा त्यांच्या सुविद्य पत्नि मा.नगरसेविका रेखाताई गावंडे यांनी दरवर्षी मोठ्या ऊत्साहाने गणेशोत्सव साजरा करत होते परंतु यावर्षीचा कोरोनाचा प्रार्दुभाव बघता गणपती न बसवता शिवाजी चौकामध्ये कोरोनाविषयक जनजागृतीपर देखावे निर्माण करुन आदर्श ऊदाहरण घालुन दिले.या गणपती ऊत्सवात जो पैसा खर्च होत होता ते लक्षात घेता दि.२९ रोजी मा.ऊपविभागिय अधिकारी यशवंत देशपांडे यांच्या प्रमूख ऊपस्थीतीत तालुक्यातील दिव्यांग,वृध्द आणी गोरगरीबांना मास्क,सॅनिटायझर आणी कपड्यांचे वितरण करन्यात आले.या कार्यक्रमानिमित्य कोरोनाविषय मार्गदर्शन करुन शासकिय नियमांचे पालन करावे आणी कोरोनापासुन सर्वांनी आपला बचाव करावा असे आवाहनही करन्यात आले.सुरुवातील कार्यक्रम परिसर सॅनिटराईज करुन फिजिकल डिसटंन्सचे पालन करुन छञपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन आणी हारार्पन करुन मान्यवरांनी कपडे वितरीत केले.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कार्य करणार्‍या आरोग्य विभाग आणी पोलीस विभागाच्या कर्मचार्‍यांचा आणी सामाजिक कार्यकर्त्यांचा कोरोना योध्दा म्हणून शाल श्रिफळ,पुष्पगुच्छ देवुन सत्कार करन्यात आला.याच निमित्तावर अकोला चौकातील सेवाभावी वृत्तीने सुरु करन्यात आलेली पानपोईचेही ऊद्घाटन ऊपविभागिय अधिकारी यांचे हस्ते करन्यात आले.यावेळी भाजपा नगरसेवक अनिल गावंडे,मा.नगरसेविका रेखाताई गावंडे,मंडळ अधिकारी दिलिप चौधरी,शिवराज गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गावंडे,रवि चव्हाण,सुनिल मालपाणी,विजु मोरे,विनोद कोळकर,मोंटु वाघमारे,इश्वर जोशी, गावंडे,वैभव गावंडे,वैभव वाघमारे,निलेश राऊत,शुभम नैताम,नगरसेवक आकाश संगत,निलेश शिंदे यांचेसह आरोग्य विभागाचे कर्मचारी,पोलिस कर्मचारी,शिवराज मिञमंडळाचे पदाधिकारी यांची प्रामुख्याने ऊपस्थीती होती.

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

मो.8459273206

Updated : 8 Sep 2020 11:50 AM GMT
Next Story
Share it
Top