Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शिरोली येथील कोरवते कुटुंबियांनी दिला समरसतेचा परिचय - निमित्त श्रामनेर शिबिराचे

शिरोली येथील कोरवते कुटुंबियांनी दिला समरसतेचा परिचय - निमित्त श्रामनेर शिबिराचे

शिरोली येथील कोरवते कुटुंबियांनी दिला समरसतेचा परिचय - निमित्त श्रामनेर शिबिराचे
X

शिरोली येथील कोरवते कुटुंबियांनी दिला समरसतेचा परिचय - निमित्त श्रामनेर शिबिराचे

प्रतिनिधी/कज्जुम कुरेशी

यवतमाळ/घाटंजी : तालुक्यातील शिरोली येथे दि.14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2020 या कालावधीत तेरा दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराला मुख्य मार्गदर्शक व आयोजक म्हणून पूज्य. भिक्खु सारीपुत (शिरोली) व भिक्खू मेतानद (नांदेड)हे लाभले. या शिबिरात श्रामणेर म्हणून भंते आनद, भंते अनिरुद्ध, भन्ते सुभद्र, भंते पटीसेन, भंते सुमगल, भंते रठ्ठपाल व भंते यशपाल यांनी दिक्षा घेतली.

मुख्य भदंत व श्रामनेर यांच्या भोजनदानाची व्यवस्था शिरोली व परिसरातील बौध्द अनुयायी यांच्यातर्फे करण्यात आली होती. विशेष म्हणजे पुष्पा कोरवते व तुकाराम कोरवते या दाम्पत्यांनी संघाला भोजनदान देऊन आपल्या समरसतेचा परिचय दिला. आपल्या स्वगृही भिक्खू व श्रामनेर संघाला बोलावून, माना सन्मानाने भोजनदान देऊन दान पारमिता पाळल्याबद्दल त्या कुटुंबियांचे सर्वत्र कौतुक होते आहे.

प्रसंगी वंचित बहुजन आघाडी चे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे, संजय कांबळे (तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा), नरेंद्र भगत, रमेश कुमरे, चंद्रकांत इंगळे पाटील, हरी जीवने, लक्ष्मण कोरवते, मारोती कोरवते, अशोक सोयाम, रमेश धुर्वे, रामकृष्ण कोरवते, शालीक सिडाम, अंकुश आडे, देवराव धुर्वे, उल्हास लोखंडे, श्रीकांत लोखंडे, प्रकाश सिसले, पालिका सिसले, राधाबाई हलवले, मीना लोखंडे, कांताबाई सिसले, त्रिशिला सिसले, नेहाबाई जीवने, रोहिणी हलवले, बेबीबाई मुनेश्वर, चित्रकला पाटील व गावकरी हजर होते.

सदर श्रामणेर शिबिराचे नियोजन रमाई महिला मंडळ शिरोली व संघर्ष मंच शिरोली व्दारा करण्यात आले. सदर शिबिर यशस्वी होण्याकरिता गावातील बौद्ध अनुयायी, उपासक व उपासिकानी प्रयत्न केले.

Updated : 27 Nov 2020 10:16 AM GMT
Next Story
Share it
Top