Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शिरूर अनंतपाळ येथे श्री अनंतपाळ बहुउद्देशिय विकास संस्था तसेच पोलीस ठाणे शिरुर अनंतपाळ यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम

शिरूर अनंतपाळ येथे श्री अनंतपाळ बहुउद्देशिय विकास संस्था तसेच पोलीस ठाणे शिरुर अनंतपाळ यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम

शिरूर अनंतपाळ येथे श्री अनंतपाळ बहुउद्देशिय विकास संस्था तसेच पोलीस ठाणे शिरुर अनंतपाळ यांच्या वतीने वृक्षारोपण मोहीम
X

लातूर /शिरूर अनंतपाळ :जिल्हा प्रतिनिधी शिरसे प्रवीण

श्री.अनंतपाळ बहुउद्देशिय विकास संस्था पोलीस ठाणे शिरुर अनंतपाळ यांच्या संयुक्त विद्यामाने शि.अनंतपाळ शहरामध्ये अजनी चौक ते नगरपंचायत कार्यालया ला जाणाऱ्या रस्ता दुभाजकाची स्वच्छता करून त्यातील सर्व गवत काढून तेथे विविध प्रकारची शोभिवंत तसेच इतर झाडे लावून टँकर ने पाणी देत वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,सेवाभावी संस्थेचे श्री.बापुराव देवंगरे गुरुजी,पोलीस उपनिरीक्षक मलय्या स्वामी,वैद्यकीय अधिकारी डाॅ.बालाजी देवंगरे,ज्येष्ठ व्यापारी बालाजी यरमलवार,तंटामुक्ती अध्यक्ष शंकर दाजी बेंबळगे,धनाजीराव लखनगावे सर,पोलीस कर्मचारी सुर्यकांत येडले पाटील,तुमकुटे,अस्लम सय्यद ई उपस्थीत होते. पर्यावरणाचा समतोल राखला जावा, वृक्ष लागवड व संवर्धनाचे महत्त्व लोकांना समजावे तसेच शहर सुशोभीत व्हावे याकरीता वृक्ष लागवड मोहीम करण्यात आली. याप्रसंगी हि झाडे जगविण्याचा संकल्प उपस्थीतांच्या वतीने करण्यात आला.

Updated : 24 Nov 2020 6:17 PM GMT
Next Story
Share it
Top