शिरूर अनंतपाळ येथे गुणवंताचा सत्कार ;स्वप्नील चे स्वप्न साकारले...
X
म मराठी न्यूज टीम
प्रतिनिधी/शिरसे प्रवीण
लातूर/(शिरूर अनंतपाळ) दि.१७ : शिरूर अनंतपाळ नगरीचे उपनगराध्यक्ष संजय व्यंजने यांचे चिरंजीव स्वप्नील संजय व्यंजने यांने Neet परीक्षेत 616 गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. अकरावी वर्गाच्या सुरुवातीपासूनच त्याने कठोर मेहनत घेतली . कोरोनाने जी परिस्थिती झाली होती त्यावर घरी बसून ऑनलाईन तासिका, सराव परीक्षा देत त्याने कोरोनावर मात केली.
उत्तुंग यश मिळवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव आवाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजय पांचाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नामदेवराव लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते प्रमोद धुमाळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप धुमाळे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ उजेडे, अमोल दुरूगकर, विशाल गिलचे उपस्थित होते या वेळी सत्कार करून पुढील शैक्षणिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.