शिक्षणमहर्षी कै.प्राचार्य रमेशचंद्रजी मुनघाटे यांची जयंती साजरी.
शिक्षणमहर्षी कै.प्राचार्य रमेशचंद्रजी मुनघाटे यांची जयंती साजरी.
म-मराठी न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी/दिवाकर भोयर
गडचिरोली धानोरा :- स्थानिक धानोरा येथील श्री जी.सी. पाटील मुनघाटे महाविद्यालयात श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर -गडचिरोलि चे संस्थापक अध्यक्ष मान. कै.रमेशचंद्रजी मुनघाटे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.विना जंबेवार उपस्थित होते.या प्रसंगी प्राचार्य यांनी कै.प्राचार्य रमेशचंद्रजी मुनघाटे यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल मोलाची माहिती दिली .उच्च शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी करिता साहेबांनी शैक्षणिक संस्थेची स्थापना केली या संस्थेद्वारे प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत ची संधी आदिवासी बहुल भागामध्ये उपलब्ध करून दिली त्यांची संस्था चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यात शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात नामांकित संस्था म्हणून गौरविण्यात येते. राजकीय क्षेत्रात देखील जील्हा परिषद सदस्य म्हणून त्यांचे योगदान लाभले आहे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाचे महामेरू प्राचार्य रमेशचंद्रजी मुनघाटे साहेब होते असे मत प्राचार्य डॉ विना जंबेवार यांनी अभिवादन रूपाने व्यक्त केले.संचालन प्रा.ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रा. गोहने यांनी मानले या प्रसंगी श्रीमती अल्का सज्जनपवा र,भास्कर कायते, डंबाजी हर्षे,भास्कर वाढणकर,बालाजी राजगडे .आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.