Home > महाराष्ट्र राज्य > शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी सरसकट आर्थिक मदत द्यावी --------आमदार रणधीर सावरकर

शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी सरसकट आर्थिक मदत द्यावी --------आमदार रणधीर सावरकर

अकोला- जिल्ह्यात बोंड अळीच्या थैमानाने कापूस पीक शेतकऱ्यांचे हातून जाण्याचे मार्गावर असल्याने, आमदार रणधीर सावरकरांनी कापूस तज्ञ शास्त्रज्ञांसह केळीवेळी शिवारात बोंड अळी ग्रस्त शेतांची पाहणी करून प्रत्यक्ष क्षेत्रावरच शेतकऱ्यांना तज्ञां समवेत केले मार्गदर्शन....

शेतकऱ्यांप्रति कायम बांधिलकी जपणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी केळीवेळी शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन बोंड अळी ग्रस्त कपाशी पिकाच्या नुकसानीची , कपाशी तज्ञ शास्त्रज्ञांसह पाहणी केली यापूर्वीसुद्धा आमदार सावरकर यांनी जिल्ह्यातील अनेक गावातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बोंड अळी ग्रस्त कापून पिकांची पाहणी करून शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी सरसकट आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शासनाकडे केली होती सदरच्या मागणीनुसार कृषी विभागाने कापूस पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला नुकताच सादर केला आहे खरीप हंगाम 2020 -2021 अंतर्गत जिल्ह्यात एक लाख 45 हजार 894 हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला असून एक लाख 16 हजार 534 हेक्‍टरवरील कपाशी पीक म्हणजे 80% क्षेत्र बोंड अळी ने ग्रासले असल्याचा अहवाल कृषी विभागाने शासनास नुकताच सादर केलेला आहे सदर अहवालात 30 टक्केच कपाशी पिकाचे नुकसान झाल्याची शक्यता कृषी विभागाने शासनाकडे कळविली आहे यासर्व पार्श्वभूमीवर आमदार रणधीर सावरकर यांनी कृषी विभागाचे अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कपाशी पीक शेतावर पाचारण करून डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कपाशी तज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर उंदीरवाडे यांचेसह शेतकऱ्यांचे उपस्थित केळीवेळी शिवारातील कापूस पिकाची काही केली असता मोठ्या प्रमाणात कापूस पीक धोक्यात आल्याने पूर्ण पिक नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे .शासनाने सदर नुकसानीचे अत्यंत तातडीने सर्वेक्षण व पंचनामे करावे तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शासनाकडे केली आहे . एक अभ्यासू व परखड विचार करणारा लोक प्रतीनिधि अशी जनमानसात प्रतिमा असणाऱ्या आमदार रणधीर सावरकर यांनी डिसेंबर 2017 चे विधानसभा अधिवेशनात बोंड अळीचा प्रादुर्भाव, उत्पत्ती व उपाय योजना यावर सभाग्रहात अभ्यासपूर्ण विवेचन केले होते , आज रोजी केळीवेळी येथे बोंड अळी प्रभावित शेती क्षेत्रावर त्यांनी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले तसेच कापूस पीक तज्ञ शास्त्रज्ञ डॉक्टर उंदीरवाडे यांनीसुद्धा शास्त्रीय मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष नित्य अनुभव व अभ्यासातून सामान्य जनतेच्या सतत मदतीला धावून जाणार्‍या आमदार रणधीर सावरकरांचे प्रक्षेत्र भेटीदरम्यान पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी यांचेसह संतोष शिवरकर ,माधव बकाल, गजानन नळे, किशोर बुले, विवेक भरणे ,मधु भाऊ पाटकर ,दत्तू पाटील गावंडे, बळीराम इंगळे, अनिल इंगळे, पुरुषोत्तम नळे,डॉक्टर बुले निलेश बकाल ,शरद नळे ,शारंगधर बेंडे,मुकुंद बकाल ,भगवान आढे, बाळाभाऊ आढे, महेश आढे, बाळाभाऊ अंबलकार, भास्कर शिवरकर ,विनायक खेडकर ,विनायक बुले ,नजीर शहा ,भरत चराटे आधी उपस्थित होते

Updated : 17 Nov 2020 6:26 PM GMT
Next Story
Share it
Top