शाळे जवळ नवीन पुलाला सुरक्षा भिंत चे बांधकाम करण्यात यावे...
X
एम .आय .एम
पदाधिकाऱ्यांची मागणी...
म मराठी न्युज टीम
पुसद प्रतिनिधि फिरोज खान
पुसद :- स्थानिक हजरत उमर फारूक उर्दू (र.जि.) शाळा जवळचे नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे हा नवीन पुल मुस्लिम कब्रस्थानला जाणारा हा पुल आहे त्या पुला ला सुरक्षा भिंत नाही आहे पुलाला सुरक्षा भिंत चे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे कारण तिथे राहणारे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकते , तसेच शाळेचे लहान मुले , मुली , महिला व वयोवृद्ध ला जाण्या साठी या रोड़चा वापर केला जातो सुरक्षा भिंत नसल्याने कोणतीही हानी होऊ शकते या सुरक्षा भिंत चे बांधकाम लवकरात लवकर करावे अशी मागणी ए. आय. एम.आय.एम. पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी न.प.किरण सुकलवाड यांना एका लेखी निवेदनाद्वारे केली तर प्रतीलिपी मध्ये नगर परिषद अध्यक्षा , मा.आमदार इंद्रनिल नाईक ,आमदार मा. डॉ. वजाहत मिर्झा यांना देण्यात आले आहे..
या वेळी निवेदन देतांनी अमजद खान एम.आय.एम तालुकाध्यक्ष , सैय्यद सिद्दीकोद्दिन शहर अध्यक्ष , मिर्झा आदिल बेग जिल्हा प्रतिनिधी , फिरोज खान एम.आय.एम युवक तालुकाध्यक्ष , डॉ.अन्सार शेख महासचिव , अमनुल्लाह खान महासचिव शहर , अब्दुल रहेमान चव्हाण , अतीक शेख सोशल मीडिया व अरुण-ले-आउट, रहेमत नगर , पार्वती नगर, कानडे- ले- आऊट चे रहिवासी उपस्थित होते..