Latest News
Home > लेख > शहीदांच्या वर्दी ला सलाम!

शहीदांच्या वर्दी ला सलाम!

शहीदांच्या वर्दी ला सलाम!
X

शहीदांच्या वर्दी ला सलाम!

.................................................

जय हिंद,जय भीम,जय भारत.

भाग- 1

..................................................

26/11 या देशाच्या ऐतिहासिक दस्तऐवज मधील,दुःखद दिवस म्हणून ओळखला जातो.या देशाची आर्थिक राजधानी म्हणूनओळखल्या जाणाऱ्या मुंबई वरती,दहशतवादी असणाऱ्या एका संघटनेच्या अतिरेक्यांनी,केलेल्या भ्याड हल्ल्यात,महाराष्ट्रातील,मराठी सुपुत्रांना,वीरगती प्राप्त झाली.शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबाळे यांचेसह,भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील,राजपत्रित अधिकारी वर्ग 1,चे, चार आयपीएस अधिकारी,यांना वीरगती प्राप्त झाली.यातील,स्वर्गवासी अशोक कामटे,हे कोल्हापुर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून कोल्हापूरला काही काळ कार्यरत होते.एक नावाजलेले खेळाडू म्हणून त्यांची ओळख होती.मालेगाव येथील झालेल्या जातीय दंगल प्रकरणी,तपासाअंती तत्कालीन आरोपी व विद्यमान खासदार साध्वी प्रज्ञा सिंग ला अटक करणारे,अधिकारी म्हणून शहीद हेमंत करकरे यांना ओळखले जाते.यांच्यासह अन्य दोन अधिकारी हे शहीद झाले होते.तर काही निष्पाप लोकांना याच्यामध्ये आपला जीव देखील गमवावा लागलेला होता.

तर काही लोक हे जखमी झाले होते.वर्दी आणि सुरक्षा यांचं

घट्ट जोडले गेलेले एक वेगळं नातं आहे.या देशातील कोणत्याही नागरिकाला सुरक्षा देण्यासाठी,वर्दी ही 24 तास डोळे उघडे ठेवून आपले काम चोखपणे सांभाळत असते. इंटेलिजन्स ब्युरो सारख्या(ib) राष्ट्रीय गुप्तचर तपास यंत्रणा,यांनी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे राज्य सरकारला,अशा पद्धतीचा हल्ला होऊ शकतो अशी कल्पना दिली होती असल्याचे बोलले जाते.याचा संदर्भ एका लेखक महोदयांनी प्रसिद्ध केलेल्या

who killed is Karkare ?

या पुस्तकांमध्ये आढळून येतो.तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या,काळात 26/11 रोजी झालेला दहशतवादी हल्ला हा खूप मोठा, हल्ला असून,या हल्ल्याचा निषेध संपूर्ण जगातल्या अनेक राष्ट्रांनी केला आहे.या हल्ला करणाऱ्या अतिरेकी संघटनाना,पोसणारे पाकिस्तानच सरकार,भारताबरोबर आणखीन किती काळ संघर्ष करत राहणार आहे याची खात्री व शाश्वती देता येणार नाही.

कारण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना 2020 रोजी,दिवसागणिक एका जवानाला शहीद व्हायची वेळ येऊन ठेपलेली आहे. 26 /11 च्या झालेल्या हल्ल्यात कडे पाठमोर्‍या कृतीने वळून बघितले असता,तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख व गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील,या दोन्ही व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्याने,या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार,म्हणून त्यांची नोंद घेणे क्रमप्राप्त ठरते.राज्य गुप्तवार्ता विभाग,राष्ट्रीय पातळीवरील राष्ट्रीय तपास यंत्रणा,एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना प्रगत झालेला तंत्रज्ञानाने सायबर विभाग,यासारखे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी कार्यक्षम झालेला दिसून येतो आज रोजी.

................................................

लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे.

Updated : 24 Nov 2020 2:03 PM GMT
Next Story
Share it
Top