Latest News

# शब्दभाषा #

# शब्दभाषा #
X

# शब्दभाषा #

ऐकण्या तुझी ती मुकी शब्दभाषा

आसुसले माझे रोमकर्ण सारे,

जाणून असे मी, तू बंधनात तयांच्या

असतील तुझ्यावर नीतिमत्तेचे पहारे ।।

विराहामुळे जगण्यात राम नाही

तुझ्याविना असे जग हे अंधारे,

जर भेदलास तू तो निर्दयी पाशबंध

तुज देतील दूषणं हे दुष्ट विश्वसारे ।।

होऊन निर्दयी घात केला तयांनी

विश्वासिलो मी जयांच्या आधारे,

क्षमवण्या मर्मअग्नी यत्न मीच केला

पण विपरीत वहाले ते निष्ठुर वारे ।।

तुझ्या आठवणींचा अमूल्य मर्मसाठा

स्मरिला मी हरवुन माझे भानसारे,

नकळत तरळले मोतीबिंदू कडांना

वाहिले आसवांचे अश्रूपाट सारे ।।

जाणून असे मी, तू बंधनात तयांच्या

आहे तुझ्यावर नीतिमत्तेचे पहारे....

शब्दरचना

पराग पिंगळे

यवतमाळ

02 जुलै 2020

Updated : 3 July 2020 5:38 AM GMT
Next Story
Share it
Top