व्हा रे दिग्रस पोलिसांची कार्यप्रणाली चोरटे पडले पोलिसांना भारी..
X
■व्हा रे दिग्रस पोलिसांची कार्यप्रणाली चोरटे पडले पोलिसांना भारी■
■पोलीस कर्मचाऱ्यांच्या घरी दोन लाखाची चोरी-ठाणेदार साहेब लक्ष देतील का?■
प्रतिनिधी/प्रा.सय्यद मोहसिन
यवतमाळ/दिग्रस: तालुक्यात सातत्याने चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.शहरात व ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढत असून चोरांचा शोध लावण्यात दिग्रस पोलीस प्रशासन असमर्थ दिसत आहेत.शहरात चोरीचे गुन्हे घडत असून पोलीस हातात हात घेऊन बसल्याने भामट्या चोरट्याची हिम्मत वाढत चालली आहेत.
याचा प्रत्यय १९ नव्हेंबर रोजी एका पोलीस कर्मचाऱ्यांचा घरी चोरीच्या घटनेने आला.सविस्तर वृत्त असे की दिग्रस शहरातील साईनाथनगर येथील रहिवासी पोलीस कर्मचारी मिथुन जाधव यांचे घर फोडून चोरट्यांनी गुरुवारी २ लाख रुपयांचे साहित्यासह दागिन्यांवर डल्ला मारला.
१८ नव्हेंबर रोजी पोलीस कर्मचारी मिथुन जाधव व त्यांचा परिवारातील सदस्य नातेवाईकांच्या अंत्यविधी साठी मूळ गावी गेले असता घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरातील लाकडी अलमारीत ठेवलेले दोन तोळे सोन्याची पोत अंदाजे किंमत एक लाख रुपये,तीन ग्राम वजनाची अंगठी,कपडे,भांडे,लहान मुलीचे खेळणे बाहुल्या,पाच हजार रोख असे एकूण अंदाजे दोन लाख ऐवज लंपास केले.पोलीस कर्मचाऱ्यांचा आई जमुना सुदाम जाधव यांचा फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
दिग्रस पोलिसांच्या कार्यशून्य प्रणालीमुळे नागरिकांचे पोलीस यंत्रणेवरचा विश्वास उडत चालला आहेत.शहरात मोठ्या प्रमाणात घरफोडी,मोबाईल चोरी,शेतातील साहित्य चोरी,घरातील साहित्य,दागिने चोरीच्या घटना वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.वाढत्या चोरीच्या घटनेत अंकुश कोण लावणार असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहेत.पोलीस अधीक्षकांनी याकडे जातीने लक्ष देऊन तपास करण्याची मागणी सर्वसामान्य जनता करत आहेत.