Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > 'व्रतस्थ' चळवळीतील माणसे !

'व्रतस्थ' चळवळीतील माणसे !

व्रतस्थ चळवळीतील माणसे !
X

लेखक : श्री.तानाजी सखाराम कांबळे.

......................................................................

email : TanajiKamble33gmail.com

..................................................................

मोबाईल नंबर : 80805329 37.( part no,1.)

.......................................................................

अनेक चळवळी ह्या" व्रतस्थ "असतात.चळवळीत काम करणारे माणसं ही विविध प्रकारे समाजकार्यासाठी ध्येयानं झपाटलेली असतात.सामाजिक सुधारणेसाठी अनेक माणसं ही,सामाजिक विकासासाठी त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी तसेच,विकासाचे नवीन मार्ग खुले करण्यासाठी एका विशिष्ट ध्येयाने व व्रताने झपाटलेली असतात. लोकांचे प्रश्न समजावून घेणे आणि ते सोडवण्यासाठी सतत धडपड करणे,ही ह्या व्रतस्थ लोकांची एकमेव कामे असतात.अशी सामाजिक कामे सोडवण्यासाठी ते आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील वेळ,सार्वजनिक जीवनासाठी खर्च करत असतात. त्यामुळे काळाच्या बदलत्या ओघात त्यांची वेळ कधी निघून गेली हे त्यांना पाठीमागें बघून देखील समजत नाही, वा त्या व्यक्ती त्याचा फार काळ विचार करत नाहीत. सामाजिक सुधारणेची अध्यात्मिक तपोभूमी, म्हणून गगनबावडा अर्थात परमपूज्य योगीराज ध्यानस्थ,श्रीमंत गगनगिरी महाराज यांच्या तपोभूमी मुळे,गगनबावडा हा महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक, आणि सांस्कृतिक रजत पाटावरती कोरला गेलेला आहे. सह्याद्रीच्या आती, नयनरम्य कडेकपारी, लघुपाटबंधारे तलावामुळे जंगल,शेजारी असणारे तीन खोर्‍यातील सौंदर्याचे परी साधन, 63 खेड्यांची मालकीण म्हणून सर्वदूर परीचीत असणाऱ्या असंडोली येथील श्री रासाई देवी च्या, आशीर्वादाच्या परीवेगाने व्यापलेल्या, इतिहासकार श्रीमंत रामचंद्र पंत अमात्य बावडेकर सरकार यांच्या बावडा जहागिरीच्या असलंज तालुका गगनबावडा येथील, पंत अमात्य बावडेकर सरकार यांचा टुमदार दिसणारा वाडा, अशा अनेक प्रकारच्या सौंदर्य सृष्टीत भर घालणाऱ्या गोष्टी, गगनबावडा तालुक्याच्या इतिहासिक विकासामध्ये भर घालणाऱ्या पडल्या आहेत.मात्र तरीदेखील वर्षानुवर्षे या तालुक्याला मागासलेला पडलेला ठपका, दर्या डोंगर, खोऱ्यातील दुर्गम असा भाग, वेडीवाकडी वळणे म्हणून परिचित असणारा गगनबावडा तालुका,आज विकासाचे दृष्टिकोनातून कात टाकत आहे. या पाठीमागे,भूमिपुत्र तथा जिल्हा परिषद,जिल्हा नियोजन समिती कोल्हापूरचे विद्यमान सदस्य, सेवानिवृत्त अध्यापक, तथा गोरगरीब कष्टकरी दिन दलित,शोषित पीडित, बेरोजगारांचे आधारस्तंभ व आशास्थान, श्री भगवान बापू पाटील,रा. तिसंगी,ता. गगनबावडा यांचेकडे" व्रतस्थ चळवळीची कात"टाकणारा पुढारलेला "माणूस" म्हणून बघितले जाते.श्री पाटील यांच्याकडे जिल्हा परिषद कोल्हापूरच 'पालकत्व' म्हणून बघितले जाते.

जिल्हा परिषद कोल्हापूरला दुसरी टर्म सदस्य पदाची मारणारे,

श्री पाटील यांना जिल्हा परिषदेच्या मुख्यालयामध्ये, शिपाई पदापासून ते मुख्य कार्यकारी अधिकारी पदापर्यंत अनेकजन, आलेले, गेलेले, विद्यमान असलेले, प्रशासकीय अधिकारी कर्मचारी,सदस्य, पदाधिकारी, सत्ता असो वा नसो मात्र पालकत्वाचा मान नेहमी देत असतात.जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने त्यांना,दोन वेळा" शाहू पुरस्काराने सपत्निक" गौरविण्यात आलेले आहे. तर कोल्हापूर जिल्हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना, जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक सदस्य पदाच्या, सेवानिवृत्तीनंतर सपत्निक गौरविण्यात आलेल्या चा पहिला बहुमान सदस्य श्री भगवान बापू पाटील यांच्याकडे जातो. या सर्वसमावेशक अवलिया समाज सुधारकाला,जिल्हा परिषद कोल्हापूर कडे,लोकप्रियता व लोकमान्यता या दोन्ही गोष्टी चिकटलेल्या आहेत. तिसंगी तालुका गगनबावडा हे श्री पाटील यांचे जन्मगाव, एकत्र कुटुंब पद्धतीने कुटुंब प्रमुख म्हणून,श्री.पाटील यांच्याकडे,तिसंगी मध्ये पाहिले जाते. घरामध्ये विविध पुरस्काराचा मान सन्मान खच्चून भरला आहे.

वडील स्वर्गवासी बापू पाटील यांचा "न्यायिक" वारसा,

श्री पाटील हे आपल्या दुसऱ्या पिढीमध्ये चालवत आहेत. सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत, परिसरातील अनेक लहान-थोर मोठ्या, माता, भगिनी, महिला, व पुरुष यांच्या समस्या सोडवण्यासाठी चा" मिनी दरबार " श्री पाटील यांच्या घरामध्ये दर दिवशी भरला जातो.सरांचा निर्णय आणि मार्गदर्शन यामुळे येणारा नक्कीच नाखूष होऊन जात नाही. महाराष्ट्रातील पहिले तिसंगी तालुका गगनबावडा हे"तंटामुक्त" गाव म्हणून श्री पाटील यांच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत त्यांना बहुमान मिळाला होता.श्री पाटील यांच्याकडे जिल्हा परिषद कोल्हापूर चा आरोग्य विभाग व शिक्षण विभाग आपुलकीने तसे पालकत्वाच्या नात्याने, पहात आहे.

Updated : 25 July 2020 2:40 PM GMT
Next Story
Share it
Top