वैनगंगा नदीच्या पुलावर झालेल्या अपघात मुलगा बेपत्ता तर मुलगी जखमी
दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523 गडचिरोली /आरमोरी
आरमोरी ते ब्रम्हपुरी- मुख्य महामार्गावर असलेल्या वैनगंगा नदी पुलावर मुलगा व मुलगी हे दोघेही दुचाकीने जात असतांना अचानक दुचाकी ही वैनगंगा नदीपुलाच्या डिवायडरला आपटलि आणि तोल जावुन मुलगा नदीत पडला तर मुलगी पुलावर पडून जखमी झाली. मुलगा व मुलगी दोघेही स्पेडर गाडि MH49BF3593 ने जात असताना अचानक गाडी लोखंडी खांबालाआपटली .त्यानंतर नियंत्रण सुटल्याने
त्यामध्ये दुचाकी चालक मुलाचा तोल जावून नदीपुलावरून नदीपात्राच्या पाण्यात पडून लुप्त झाला तर मुलगी ही पुलावर पडल्याने त्यामध्ये दुचाकी स्वार मुलगी जखमी झाली.
लगेच दुचाकी स्वाराला शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू केली असता दुचाकी स्वारांचा पत्ता लागला नाही.
दुचाकी चालक मुलाचे नाव इरफान शेख तर मुलिचे.नाव कळू शकले नाही.
दुचाकीचालक मुलगा हा दुचाकीस्वार मुलीला दुचाकी चालविण्याचे शिक्षण देत होता.
घटनेचा तपास सुरू असून नदीपात्राच्या पाण्यात लुप्त झालेल्या दुचाकी चालकाचा शोध संबंधीत विभाग करीत आहे.