Home > महाराष्ट्र राज्य > विमा कंपनी ने केली शेतकऱ्यांची फसवणूक

विमा कंपनी ने केली शेतकऱ्यांची फसवणूक

विमा कंपनी ने केली शेतकऱ्यांची फसवणूक
X

विमा कंपनी ने केली शेतकऱ्यांची फसवणूक

प्रतिनिधी/डी आर वानखडे

अमरावती : सोयाबीन पिकाच्या कापणीच्या

वेळी सतत पावसामुळे सोयाबीन पिक पुर्ण सडून, कुजून, नष्ट झाल्याची .सर्व माहिती विमा अधिकारी यांना वांरवार फोन करून दिली .विमा अधिकाऱ्याने विषेश दखल न घेता ४८ तासांचे आत तुम्ही आॅन लाईन तक्रार करा. अन्यथा तुमच्या पिकाची पाहणी करने शक्य नाही असे उत्तर दिले .काही शेतकऱ्यांनी आॅन लाईन तक्रार कराचा प्रयत्न केला पण प्रयत्न असफल ठरले .तर काही ना आॅनलाइन कसे करावे हेच समजत नाही. शेतकऱ्यांच्या साधेपणाचा फायदा विमा कंपनीने घेतला. पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपनी च्या हेकेखोर पणा मुळे पिक विमा नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित राहिला

विमा कंपनीच्या निषेधार्ह आज अनिल ऊर्फ राजू गंधे सचिव भा ज पा अमरावती जिल्हा यांचे नेतृत्वाखाली विमा कंपनीच्या हेकेखोर पणाची होळी करून निषेध व्यक्त केला विमा कंपनीने शेतकरऱ्याची फसवणूक केली.

आम्हाला न्याय मिळवा म्हणून

मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले

या वेळी भा ज पा कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते

उपस्थिती मध्ये भरत लव्हाळे, देवेंद्र लव्हाळे, हरिष नवरे, अतुल ढोक, अमोल ढवळे, अक्षय धर्माळे, राजू कळसकर, पांडुरंग जिभकाटे, सोपन पेढेकर, रमेश मुदांने, रवी नावंदर, हरिष, लव्हाळे, प्रविण गंधे, संजय दरक,लक्ष्मी बाई मदनकर,मोहन वडे, सरकार बावनकुळे,विजय कडु, जयप्रकाश नावंदर,निलेश मस्के, घनश्याम माथुरकर, मनोहर कोल्हे, सागर लव्हाळे ,भिम जागर चे जेष्ठ पत्रकार श्री डि. आर. वानखेडे उपस्थित होते.

Updated : 27 Nov 2020 3:58 PM GMT
Next Story
Share it
Top