Home > विदर्भ > विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी काड्या फीती लावून केला शिक्षक दिवस साजरा

विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी काड्या फीती लावून केला शिक्षक दिवस साजरा

विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी काड्या फीती लावून केला शिक्षक दिवस साजरा
X

दिवाकर भोयर म मराठी न्यूज धानोरा प्रतिनिधी (जि.गडचिरोली.) 9421660523

5 सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी काड्या फिती लावून सरकारच्या धोरणाचा निषेध करत शिक्षक दिवस साजरा केला. तसेच विनाअनुदानित शाळांच्या मंत्रिमंडळ निर्णयाला एक वर्ष पूर्ण होऊनही अंमलबजावणी न झाल्याने शासनाच्या या निर्णयाचा काळा बर्थडे म्हणून सुद्धा साजरा करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील विनाअनुदानित व अंशत अनुदानित शाळेत 5 सप्टेंबरला शिक्षक दिन हा काळा दिन म्हणून साजरा करण्यात आला. कोरची तालुक्यातील राष्ट्रीय विद्यालय बिहीटेकला या शाळेतील संपूर्ण कर्मचाऱ्यांनी तोंडाला काळे मास्क लावून शासनाचा निषेध केला. निषेध व्यक्त करताना एम. एस. कवाडकर, पुल्लुरवार, खोब्रागडे, बेरूगवार, फूलकवर मॅडम, संजय सोरी, नामदेव गौरकार आदि शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 10:30 AM GMT
Next Story
Share it
Top