Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > विनाअनुदानित शाळांमधील शालेय फी माफ करण्यात यावी-- एम. पी. जे. ची मागणी

विनाअनुदानित शाळांमधील शालेय फी माफ करण्यात यावी-- एम. पी. जे. ची मागणी

विनाअनुदानित शाळांमधील शालेय फी माफ करण्यात यावी-- एम. पी. जे. ची मागणी
X

'कोरोना विषाणू' ने संपूर्ण पृथ्वीतलावरील मानवजातीला ग्रासले आहे. या विषाणूमुळे मानवजाती अगदी हताश झाली आहे. लॉकडा उन मुळे लोकांच्या हाताला काम नसल्यामुळे सामान्य नागरिकांची अर्थव्यवस्था देखील कोलमडली आहे अश्यातच आपल्या पाल्याची शालेय फी कशी भरायची हा यक्षप्रश्न निश्चितच पालकांसमोर उभा ठाकला आहे.

सर्वसामान्यांवरील लॉकडाऊन आणि लॉकडाऊननंतरची आर्थिक अनिश्चतता लक्षात घेतली तर बऱ्याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची दाट शक्यता आहे.

म्हणून मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस फॉर वेल्फेअर चे जिल्हाध्यक्ष प्रा.सय्यद मोहसिन यांनी जिल्हाधिकारी एम डी सिंग यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना निवेदन पाठवुन खालील मागणी केली आहे.

यात मागणी करण्यात आले की सर्व विनाअनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पहिली ते बारावीच्या प्रथम सत्राची फी माफ करावी आणि या विनाअनुदानित शाळांना सरकारतर्फे फी माफीची भरपाई देण्यात यावी.

शैक्षणिक सुरक्षेसाठी सरकारने विविध विभाग व मंत्रालयांद्वारे जारी केलेली फ्री-शिप आणि शिष्यवृत्तीची संख्या तिप्पट करावी.साथीच्या ,रोगराईच्या काळात महाराष्ट्रातून बाहेर गेलेले सर्व शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थी (पहिली ते बारावी) शिक्षण प्रणालीशी पुन्हा जोडले जातील अशी व्यवस्था करावी.

अशा सर्व विद्यार्थ्यांना शक्य असेल त्या स्वरूपात शिकण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.

महामारीच्या काळात राज्य सरकारच्या समाधानकारक कार्यक्षमतेचे दर्शन घडले आहे. राज्य सरकार आमच्या

मागण्यांकडे लक्ष देईल आणि संकटात सापडलेल्या गरीब व असहाय लोकांना न्याय देईल, अशी आशा या वेळी एम पी जे च्या वतीने व्यक्त करण्यात आली.

या वेळी राशिद अ नवर ,नदीम पटेल सर ,अय्या ज खान, शोएब साहिर ,शाकीर अहमद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 13 Jun 2020 7:11 AM GMT
Next Story
Share it
Top